संरक्षण मंत्रालय
कोविड-19 पासून प्राथमिक आरोग्यसेवा व्यावसायिकांचे संरक्षण करण्यासाठी डीआरडीओने स्वछतेसाठीची विशेष बंदिस्त आवेष्टन आणि चेहऱ्याची संरक्षक आवरणे विकसित केली आहेत
Posted On:
04 APR 2020 6:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 एप्रिल 2020
कोविड-19 विरुद्ध सुरु असलेल्या प्रयत्नांमध्ये, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) वेगवान पद्धतीने उत्पादने विकसित करण्यासाठी वैज्ञानिक पराकाष्ठा करत आहे. मोठ्या प्रमाणत उत्पादन करण्यासाठी डीआरडीओ प्रयोगशाळा उद्योग भागीदारांसह काम करत आहेत.
वैयक्तिक स्वच्छतेसाठी आवेष्टन (पीएसई)
वाहन संशोधन विकास आस्थापना (व्हीआरडीई), अहमदनगर, डीआरडीओ प्रयोगशाळेने संपूर्ण शरीर निर्जंतुकीकरण चेंबर तयार केले आहे ज्याला पीएसई म्हणतात. कर्मचाऱ्यांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी हे आवेष्टन तयार करण्यात आले असून यात एकावेळी एक व्यक्ती जाऊ शकतो. सॅनिटायझर आणि साबण वितरकाने सुसज्ज अशी ही एक पोर्टेबल व्यवस्था केली आहे. या चेंबरमध्ये प्रवेश केल्यानंतर फुट पॅडल वापरून निर्जंतुकीकरण सुरु होईल. चेंबरमध्ये प्रवेश केल्यावर, विद्युत चालित पंप निर्जंतुकीकरणासाठी हायपो सोडियम क्लोराईडचे जंतुनाशक धुके तयार करते. 25 सेकंदाच्या या क्रियेसाठी धुक्याची फवारणी केली जाते आणि ही क्रिया पूर्ण झाल्याचे दर्शविल्यानंतर ते आपोआप बंद होते. प्रक्रियेनुसार, निर्जंतुकीकरणासाठी चेंबरमध्ये गेलेल्या कर्मचाऱ्याला आपले डोळे बंद ठेवणे गरजेचे आहे.
या प्रणालीमध्ये चेंबरवर छप्पर आहे आणि खालच्या बाजूला 700 लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या आहेत. रीफिलची आवश्यक भासेपर्यंत सुमारे 650 कर्मचारी निर्जंतुकीकरणासाठी या चेंबरमध्ये जाऊ शकतात.
देखरेखीच्या उद्देशाने या प्रणालीमध्ये बाजूला काचेच्या भिंती आहेत आणि रात्रीच्या वेळी कामकाजादरम्यान रोषणाईसाठी दिवे लावले आहेत. एकूण कार्यवाहीवर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र ऑपरेटर केबिन देण्यात आली आहे.
ही यंत्रणा मेसर्स डी एच एच लिमिटेड, गाझियाबादच्या मदतीने चार दिवसांच्या कालावधीत तयार केली आहे. ही यंत्रणा रुग्णालये, मॉल्स, कार्यालयीन इमारती आदींच्या नियंत्रित प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर कर्मचार्यांच्या निर्जंतुकीकरणासाठी वापरली जाऊ शकते.
संपूर्ण चेहऱ्यासाठी मास्क (एफएफएम)
कोविड-19 च्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्यसेवा व्यवसायिकांच्या सुरक्षेसाठी इमरात संशोधन केंद्र (आरसीआय), हैद्राबाद आणि टर्मिनल बालीस्टीक संशोधन प्रयोगशाळा (टीबीआरएल) चंडीगड यांनी चेहऱ्यासाठी संरक्षक मास्क विकसित केले आहेत. वजनाने हलके असणारे हे मास्क दीर्घकाळ वापरासाठी सोयीचे आहेत. या डिझाईनमध्ये चेहरा संरक्षणासाठी सामान्यतः ए 4 आकाराचे डोक्याच्या वरचा भाग झाकणारी (ओएचपी) प्रोजेक्शन फिल्म वापरली जाते.
होल्डिंग फ्रेम फ्यूजड डिपॉझिशन मॉडेलिंग (3 डी प्रिंटिंग) वापरून तयार केली जाते.
टीबीआरएलमध्ये दररोज चेहऱ्याची एक हजार संरक्षक आवरणे (फेस शील्ड) तयार केली जात आहेत आणि ते पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था (पीजीआयएमईआर), चंदीगडला देण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे आरसीआयमध्ये 100 फेस शिल्डचे उत्पादन करण्यात आले आणि ते हैदराबादच्या कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) कडे देण्यात आले. या शिल्डच्या यशस्वी चाचण्यांच्या आधारावर पीजीआयएमएसआर आणि ईएसआयसी रुग्णालयांकडून 10,000 शिल्ड्सची मागणी आली आहे.
B.Gokhale/S.Mhatre/D.Rane
(Release ID: 1611201)
Visitor Counter : 209