पर्यटन मंत्रालय

पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्राशी संबंधित उद्योग संघटनांबरोबर पर्यटन मंत्रालयाने घेतली आभासी परिषद

Posted On: 04 APR 2020 5:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 एप्रिल 2020

 

पर्यटन मंत्रालयाने पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्राशी संबंधित उद्योग संघटनांबरोबर शुक्रवारी एक आभासी परिषद घेतली. या परिषदेचे नेतृत्व पर्यटन विभागाचे सचिव योगेंद्र त्रिपाठी यांनी केले. या परिषदेला मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रिमोट कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाव्दारे झालेल्या परिषदेत सीआयआय, एफआयसीसीआय आणि आयएमएआय यासारख्या नऊ संघटनांचे आणि त्यांची मातृसंस्था असलेल्या एफएआयटीएच या संघटनेचे  प्रतिनिधी सहभागी झाले होते. 
कोविड-19 महामारीमुळे  पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रावरही संकट आले आहे. यातून बाहेर पाडण्यासाठी कोणती पावले उचलता येतील, याविषयी या परिषदेत चर्चा झाली. सध्याच्या संकटकाळात सर्व संघटना, संस्था यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणाने उभे आहे. पर्यटन क्षेत्राला अशा संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारला केलेल्या शिफारसी  आणि  सल्ले 
यांचा सरकार जरूर विचार करेल, असे आश्वासन यावेळी सरकारच्यावतीने देण्यात आले. यापुढच्या काळात देशांतर्गत पर्यटनाला चालना आणि प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येईल, असंही यावेळी सांगण्यात आलं. 
लॉकडाऊनच्या काळात लोकांनी घरामध्येच सुरक्षित राहण्याची गरज आहे, याविषयी जागरूकता निर्माण करण्यात आहे. तसेच एकदा का हा लॉकडाऊनचा- कसोटीचा काळ संपला की, सर्वांना प्रवासाची तयारी करता येईल, याचा प्रचार करण्यासाठी मंत्रालय आपल्या समाज माध्यमाचा उपयोग करीत आहे. 
सद्यपरिस्थिती लक्षात घेवून हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटने  आपले अभ्यासक्रम ऑनलाईन केले आहेत. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काही अभ्यासक्रम कमी केला आहे, असं यावेळी सांगण्यात आलं. 

 

 

G.Chippalkatti/S.Bedekar/D.Rane



(Release ID: 1611133) Visitor Counter : 125