नागरी उड्डाण मंत्रालय

देशांतर्गत मालवाहू (कार्गो) विमान सेवा कोविड-19 विरुद्धच्या भारताच्या लढाईला बळकटी प्रदान करतात


26 मार्च 2020 पासून देशभरात चाचणी संच, हातमोजे आणि अशी अनेक वैद्यकीय उपकरणे वितरीत केली

धोरण आणि स्थानिक स्तरावर चोवीस तास व्यवस्थापन आणि निर्णय प्रक्रिया सुरु

Posted On: 04 APR 2020 1:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 एप्रिल, 2020

 

नागरी उड्डाण मंत्रालय कोविड-19 विरुद्धच्या देशपातळीवरील लढाईत आपले योगदान देण्यासाठी धोरणात्मक आणि स्थानिक पातळीवर निरंतर प्रयत्न करत आहे. देशाच्या विविध भागामध्ये पोहोचवण्यात येणाऱ्या मालामध्ये कोविड-19 शी संबंधित अभिक्रीयाकारक, किण्वक, वैद्यकीय उपकरणे, चाचणी संच, आणि पीपीई, मास्क, हातमोजे आणि एचएलएलचे इतर सामान आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशांकडून असणारी मालाची मागणी आणि टपाल पाकिटांचा देखील समावेश आहे. 

 

देशभरातील विविध राज्ये आणि आयसीएमआर केंद्रांवर अत्यावश्यक वैद्यकीय पुरवठा केल्याने खालील गोष्टी साध्य झाल्या आहेत:

  • अभिक्रीयाकारक / वैद्यकीय संच वितरित केल्यामुळे रूग्णांची वेळेवर तपासणी करणे शक्य होते आणि त्यानुसार पुढील पावले उचलली जातात

  • flights डॉक्टर तसेच इतर लोक या विमान सेवे द्वारे वितरित केलेले मास्क आणि हातमोजे वापरुन स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण करू शकतात

  • ईशान्य आणि दुर्गम भागात पोचविलेल्या वैद्यकीय पुरवठ्यामुळे हे सुनिश्चित होते की कोविड-19 विरूद्धच्या लढाईत देशाचा कोणताही प्रदेश दुर्लक्षित राहणार नाही.

 

हब आणि स्पोक लाईफलाईन सेवा सुरू केल्या आहेत जेणेकरून एकाच वेळी, देशातील वेगवेगळ्या आणि दुर्गम भागांचे संरक्षण केले जाऊ शकते आणि स्रोतांचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकेल.

 

विमानसेवेची तारीखवार माहिती खालीलप्रमाणे:

अनु.क्र.

दिनांक 

एअर इंडिया 

अलायन्स 

आयएएफ 

इंडिगो 

स्पाईस जेट 

एकूण विमान उड्डाणे 

1

26.3.2020

02

--

-

-

02

04

2

27.3.2020

04

09

01

-

--

14

3

28.3.2020

04

08

-

06

--

18

4

29.3.2020

04

10

06

--

--

20

5

30.3.2020

04

-

03

--

--

07

6

31.3.2020

09

02

01

 

--

12

7

01.4.2020

03

03

04

--

-

10

8

02.4.2020

04

05

03

--

--

12

9

03.4.2020

08

--

02

--

--

10

 

एकूण उड्डाणे 

42

37

20

06

02

107

 

 

* एअर इंडिया आणि आयएएफने लडाख, दिमापूर, इम्फाल, गंगटोक, गुवाहाटी, बागडोगरा, चेन्नई आणि पोर्ट ब्लेअर येथे मालवाहतूकीसाठी सहकार्य केले.

एकूण किलोमीटर प्रवास 

 1,02,115 किलोमीटर 

3 एप्रिल 2020 रोजी एकूण मालवाहतूक  

 19.39 टन 

3 एप्रिल 2020 पर्यंतची एकूण मालवाहतूक 

  119.42 + 19.39 =  138.81 टन 

 

  • समर्पित मेडिकल एअर कार्गो संबंधित लाइफलाईन उडान हे संकेतस्थळ सुरू केले असून ती कार्यरत आहे. एमओसीए संकेतस्थळावर ((www.civilaviation.gov.in) लिंक उपलब्ध आहे.

 

आंतरराष्ट्रीय –

शांघाय आणि दिल्ली दरम्यान विमान सेवा प्रस्थापित करण्यात आली आहे. 5 एप्रिल 2020 रोजी एअर इंडियाचे पहिले मालवाहू विमान उड्डाण भरेल. अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे आणण्यासाठी एअर इंडियाचे मालवाहू विमान चीनला रवाना होणारा आहे.  

 

खाजगी ऑपरेटर -

डोमेस्टिक कार्गो ऑपरेटर; ब्ल्यू डार्ट, स्पाइसजेट आणि इंडिगो व्यावसायिक आधारावर मालवाहू उड्डाणे चालवित आहेत. स्पाईसजेट ने 24 मार्च ते 3 एप्रिल 2020 या कालवधीत 153 मालवाहू विमानांचे उड्डाण भरले असून त्यांनी 207947 किलोमीटर इतके अंतर कापून 1213.64 टन मालवाहतूक केली आहे. यापैकी 44 आंतरराष्ट्रीय मालवाहू उड्डाणे होती. ब्ल्यू डार्ट ने 25 मार्च ते 3 एप्रिल 2020 या कालवधीत 48 देशांतर्गत मालवाहू विमानांचे उड्डाण भरले असून त्यांनी 45783 किलोमीटर इतके अंतर कापून 702.43 टन मालवाहतूक केली आहे. इंडिगोने देखील 3 एप्रिल 2020 रोजी 5 मालवाहू विमानांचे उड्डाण केले असून त्यांनी 4871 किलोमीटर इतके अंतर कापून 2.33 टन मालवाहतूक केली आहे.

 

 

B.Gokhale/S.Mhatre/D.Rane


(Release ID: 1611023) Visitor Counter : 234