ऊर्जा मंत्रालय
ऊर्जा क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांकडून पीएम केअर्स निधीमध्ये रु.925 कोटी रुपयांचे योगदान
Posted On:
03 APR 2020 3:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 एप्रिल 2020
पंतप्रधान कार्यालयाने कोरोना विषाणू( कोविड-19) महामारीची झळ पोहोचणाऱ्यांना मदत देण्यासाठी स्थापन केलेल्या(सीपीएसई) पंतप्रधान नागरिक सहाय्य आणि मदत निधी मध्ये( पीएम केअर्स) केंद्रीय ऊर्जा मंत्रालय आणि अपारंपरिक/ नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयांतर्गत येणाऱ्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांनी सुमारे 925 कोटी रुपयांचे योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री आर के सिंग यांनी आज त्यांच्या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या सार्वजनिक उपक्रमांनी घेतलेल्या या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती ट्वीट करून दिली. केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय उर्जामंत्रालयांतर्गत येणाऱ्या सार्वजनिक उपक्रमांनी पीएम केअर्स निधीमध्ये 925 कोटी रुपये योगदान देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देताना आम्हाला अतिशय अभिमान वाटत आहे, असे त्यांनी सांगितले. यापैकी 445 कोटी रुपये 31 मार्च रोजी या निधीमध्ये जमा करण्यात आले आहेत आणि उर्वरित रक्कम एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा करण्यात येणार आहे. या 925 कोटी रुपयांमध्ये ऊर्जा मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या. सार्वजनिक उपक्रमांचे 905 कोटी रुपयांचे योगदान आहे तर नवीन आणि नवीकरणीय मंत्रालयांतर्गत येणाऱ्या सार्वजनिक उपक्रमांनी 20 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे, असे त्यांनी सांगितले.
कोविड-19 हा अतिशय जास्त संसर्गजन्य आजार असून तो जवळपास संपूर्ण जगभरात पसरला आहे. भारतामध्येही या महामारीने महाभयंकर आरोग्यविषयक समस्या निर्माण केली आहे आणि या आपत्तीला तोंड देण्यासाठी संपूर्ण देशाने एकत्र लढा दिला पाहिजे, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत या निधीमध्ये सढळ हस्ते मदत देणाऱ्या सर्वांची त्यांनी प्रशंसा केली.
या योगदानाचा तपशील खालील प्रमाणे आहे.
आकडेवारी कोटी रुपयात
|
पीएम केअर्स खात्यात ऊर्जा मंत्रालयांतर्गत असलेल्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांनी दिलेले योगदान
|
अनुक्रमांक
|
सीपीएसईचे नाव
|
31 मार्च 2020 पर्यंतचे योगदान
|
2020-21 साठी सीएसआर अर्थसंकल्पातून दिली जाणारी प्रस्तावित रक्कम
|
कर्मचाऱ्यांचे वेतनातून दिलेले योगदान
|
एकूण
|
-
|
NTPC
|
NIL
|
250
|
7.5
|
257.50
|
-
|
PGCIL
|
130
|
70
|
2.47
|
202.47
|
-
|
PFC
|
181
|
19
|
0.18
|
200.18
|
-
|
REC Ltd.
|
100
|
50
|
0.15
|
150.15
|
-
|
NHPC
|
20
|
30
|
1.9
|
51.90
|
-
|
SJVN Ltd.
|
5
|
20
|
0.32
|
25.32
|
-
|
THDC
|
2.0
|
7.4
|
0.60
|
10.00
|
-
|
BBMB
|
NIL
|
NIL
|
2.5
|
2.50
|
-
|
POSOCO
|
0.27
|
0.3
|
0.17
|
0.74
|
-
|
NEEPCO
|
2.56
|
1.50
|
0.60
|
4.66
|
|
|
440.83
|
448.20
|
16.39
|
|
एकूण
|
905.42
|
आकडेवारी कोटी रुपयात
पीएम केअर्स खात्यात नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयांतर्गत असलेल्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांनी दिलेले योगदान
|
अनुक्रमांक
|
सीपीएसईचे नाव
|
देण्यात येणारा निधी (CSR + Salary)
|
1.
|
IREDA
|
15
|
2.
|
SECI
|
5
|
एकूण
|
20
|
U.Ujgare/S.Patil/P.Malandkar
(Release ID: 1610752)
Visitor Counter : 196