रसायन आणि खते मंत्रालय

कोविड-19 विरुद्धच्या लढयात देशभरात वैद्यकीय सामुग्रीचा पुरवठा सुरळीत- गौडा

प्रविष्टि तिथि: 03 APR 2020 4:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 एप्रिल 2020

 

केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी सांगितले की, कोविड-19 विरुद्धच्या लढयात देशभरात वैद्यकीय सामुग्री पुरवठा सुरळीत सुरू असून कुठेही कशाचीही कमतरता भासली नाही

गौडा यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोविड-19 विरुद्धच्या लढाईत गरज आहे त्या सर्व ठिकाणी आवश्यक वैद्यकीय  सामुग्रीचा पुरवठा होईल हे सुनिश्चित केले जात आहे. गेल्या 5 दिवसांत 62 लाईफलाईन उडान विमानांनी 15.4 टनहून अधिक आवश्यक वैद्यकीय  सामुग्रीचा पुरवठा केला आहे. गेल्या चार दिवसांत मालवाहू विमानांनी देशभरात 10 टन वैद्यकीय उपकरणे पुरवली आहेत.

ते म्हणाले की, औषध निर्मिती आणि रुग्णालय उपकरणे यासारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या उत्पादनावर देखील सरकर लक्ष ठेऊन आहे. यासाठी सेझ मधील 200 हून अधिक युनिट्स कार्यान्वित आहेत.

गौडा पुढे म्हणाले की, आवश्यक वैद्यकीय वस्तूंच्या वितरणावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी आणि  मालवाहतूक संबंधित मुद्यांकडे लक्ष वेधण्यासाठी केंद्रीय नियंत्रण कक्ष देखील स्थापन करण्यात आला आहे.

U.Ujgare/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 


(रिलीज़ आईडी: 1610731) आगंतुक पटल : 183
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , English , Urdu , हिन्दी , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Kannada , Malayalam