मंत्रिमंडळ
अति उंचीवरील जैव आणि औषध क्षेत्रातल्या संयुक्त संशोधन कार्यासाठी भारत आणि किर्गीस्तान यांच्यातल्या सहयोग कराराला मंत्री मंडळाची मंजुरी
Posted On:
12 JUN 2019 8:10PM by PIB Mumbai
अति उंचीवरील जैव आणि औषध क्षेत्रातल्या संयुक्त संशोधन कार्यासाठी भारत आणि किर्गीस्तान यांच्यातल्या सहयोग कराराला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. विज्ञान आणि औषध विशेषतः अति उंचीवरील जैव आणि औषध क्षेत्रातले परस्पर संबंध अधिक दृढ आणि अधिक विकसित करण्याचा यामागचा उद्देश आहे.
यामुळे अति उंचीवरील सैन्य विषयक यंत्रणेचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जाणून घेण्यासाठी मदत होणार आहे. अति उंचावरच्या स्थानांमुळे तिथले भारतीय आणि किर्गी सैनिक आणि जनता यांच्यात निर्माण होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक समस्यांवर योगाभ्यास, वनौषधी यांचा वापर करून मात करण्याचा उद्देश आहे.
***
B.Gokhale/ N. Chitale
(Release ID: 1574207)
Visitor Counter : 183