दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय दूरसंचार विधेयक, 2022 च्या मसुद्यावर सूचना आमंत्रित

Posted On: 22 SEP 2022 3:03PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2022

भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयाने दूरसंचार क्षेत्राची आधुनिक आणि भविष्यात जरुरीच्या कायद्याच्या कक्षेतून त्याची रचना विकसित करण्यासाठी सार्वजनिक सल्लागार प्रक्रियेला आरंभ केला होता.

जुलै 2022 मध्ये, 'भारतात, दूरसंचारक्षेत्र नियंत्रित करण्यासाठी नवीन कायदेशीर चौकटीची गरज' या विषयावर एक विचार विनिमय पत्रिका प्रकाशित करण्यात आली होती आणि त्यावर टिप्पण्या, सूचना मागवण्यात आल्या होत्या.विविध हितसंबंधित आणि उद्योग संघटनांकडून यावर टिप्पण्या, सूचना प्राप्त झाल्या आहेत.

या सूचना टिपण्ण्या आणि विचारविमर्शाच्या आधारे, मंत्रालयाने आता भारतीय दूरसंचार विधेयक, 2022 चा मसुदा तयार केला आहे.

पुढील सल्लामसलत सुलभ करण्यासाठी, तसेच विधेयकाचे संक्षिप्त रुपात अवलोकन  करण्यासाठी एक स्पष्टीकरणात्मक सूचना पत्रक देखील तयार करण्यात आले आहे.

विधेयकाचा मसुदा आणि स्पष्टीकरणात्मक सूचना पत्रक https://dot.gov.in/relatedlinks/indian-telecommunication-bill-2022 या संकेतस्थळावर पाहता येईल.

सूचना पुढे दिलेल्या ईमेल आयडीवर पाठवल्या जाऊ शकतात: naveen.kumar 71@  gov.in

विधेयकाच्या मसुद्यावर सूचना पाठवण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2022 आहे.

 

 

 

 

S.Bedekar/S.Patgoankar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1861479) Visitor Counter : 301