गोवा, 25 नोव्हेंबर 2026
‘इफ्फी’ – अर्थात 57 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फक्त चित्रपटगृहे आणि महोत्सवाच्या स्थानापुरता मर्यादित राहिलेला नाही. ‘सेलिब्रेटिंग द जॉय ऑफ सिनेमा’ अर्थात चित्रपटांचा आनंद साजरा करणे, या संकल्पनेवर आधारित भव्य इफ्फी सचंलनाचे आज पणजी येथे आयोजन करण्यात आले. या संचलनामुळे पणजीच्या रस्त्यांवर गोव्याच्या कलात्मक आणि सांस्कृतिक वारशाचे चैतन्यमय दर्शन घडले. ‘एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा’ (ईएसजी) येथून सुरू झालेली ही मिरवणूक कला अकादमीच्या दिशेने मार्गस्थ झाली. रंगीबेरंगी चित्ररथ, पारंपरिक हस्तकला, लोककलांचे सादरीकरण आणि स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग ही या मिरवणुकीची वैशिष्ट्ये होती. गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडवणाऱ्या या संचलनामध्ये राज्यातील कार्निव्हल (रंगोत्सव) आणि शिगमोत्सवातील पारितोषिक विजेत्या चित्ररथांसह आकर्षक लोकनृत्य सादर करण्यात आली.
_20261125211040_432147.jpeg)
गोव्याच्या उत्सवी वातावरणाची सांगड सिनेमाच्या जागतिक आकर्षणाशी घालणाऱ्या या मिरवणुकीमुळे पर्यटक, प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांना राज्याच्या सांस्कृतिक चैतन्याचा अनुभव घेण्याची अनोखी संधी मिळाली. कला आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती या भाषा आणि भौगोलिक सीमांच्या पलीकडे जातात, हेही या मिरवणुकीतून अधोरेखित झाले. त्यातून इफ्फीच्या ‘स्टोरीज विदाउट बॉर्डर्स’ म्हणजेच सीमांच्या पलीकडील कथा या संकल्पनेचे प्रतिबिंब उमटले.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या सांस्कृतिक संचलनाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी महोत्सवासाठी उपस्थित असलेले मान्यवर, कलाकार आणि पर्यटकांचे स्वागत केले. आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला साकार करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. स्थानिक कलागुणांना प्रोत्साहन देणे, सांस्कृतिक परंपरांचे जतन करणे आणि लोकसहभागातून स्वावलंबनाला चालना देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

आकाश कंदील स्पर्धेचा उल्लेख करताना, पारंपरिक पद्धतीने हाताने तयार केलेल्या आकाश कंदिलांच्या माध्यमातून आपली सर्जनशीलता दाखवण्यासाठी गोमंतकीयांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच समाजातील लोकांचा सहभाग वाढतो आणि जुन्या सांस्कृतिक परंपरा जतन होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
सीमांच्या पलीकडील कथा ही इफ्फीची संकल्पना गोव्यातील पारंपरिक चित्ररथ मिरवणुका आणि लोककलांच्या सादरीकरणातून प्रतिबिंबित होत असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा सांस्कृतिक सादरीकरणांमुळे भाषेच्या मर्यादा ओलांडून पर्यटकांना गोव्याच्या समृद्ध कलात्मक वारशाची ओळख करून घेता येते, असे ते म्हणाले.
_20261125211214_7d5190.jpeg)
या मिरवणुकीत सहभागी झालेल्या कलाकारांचे आणि आयोजकांचे त्यांनी अभिनंदन केले. यंदाचा इफ्फी महोत्सव सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या महोत्सवांपैकी एक असल्याचे सांगत, गोवा सरकारच्या वतीने त्यांनी महोत्सवासाठी आलेल्या सर्वांचे स्वागत केले.
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/शैलेश पाटील/आशुतोष सावे/राज दळेकर/दर्शना राणे