पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भाऊबीजेनिमित्त पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 11 NOV 2026 8:37AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासीयांना भाऊबीजेच्या पवित्र सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

हा पवित्र सण भाऊ बहिणीमधील अथांग प्रेमाच्या नात्यातील गोडवा आणि आपुलकीचे प्रतीक आहे, असे त्यांनी म्हटले आहे. यानिमित्ताने त्यांनी प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी येवो अशी सदिच्छाही व्यक्त केली आहे. 

यासंदर्भात पंतप्रधानांनी ‘एक्स’वर सामायिक केलेला संदेश:

देशभरातील माझ्या सर्व कुटुंबियांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.

हा पवित्र सण भाऊ बहिणीमधील आपुलकीच्या आणि दृढ नात्यातील गोडवा आणि स्नेहाचे प्रतीक आहे.

या पवित्र सणानिमित्त मी सर्वांच्या आनंद आणि समृद्धीसाठी कामना करतो.
 

***

Nitin Fulluke / Tushar Pawar / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2335070) अभ्यागत कक्ष : 20