Posted On:
28 OCT 2026 3:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2026
BISAG-N या संस्थेने राष्ट्रीय जल अभियानाच्या (NWM) सहकार्याने विकसित केलेल्या ‘पुनःभरण (Punah Bharan) मोबाईल ॲप्लिकेशन’ चे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्या हस्ते अनावरण झाले.
वैज्ञानिक पद्धतीने भूजल पुनर्भरणाचे नियोजन करण्यासाठी जलसंपदा विभाग, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभाग, जलशक्ती मंत्रालय सहाय्य करणार आहे.
या मोबाईल अप्लिकेशनच्या सहाय्याने ग्राहकांना 3 किलोमीटरपर्यंतच्या त्रिज्येतील संभाव्य कृत्रिम भूजल पुनर्भरण क्षेत्रे ओळखण्यास आणि स्थानिक परिस्थितीनुसार योग्य पुनर्भरण संरचनांचा शोध घेण्यास मदत होईल.
हे वेब पोर्टल गावपातळीवरील कृत्रिम भूजल पुनर्भरण रचना क्षेत्रीकरणाचे नकाशे, जीआयएस (GIS) साधने आणि विषयाभिमुख स्तर उपलब्ध करून देते, जे शाश्वत भूजल व्यवस्थापनासाठी माहितीपूर्ण नियोजनाला मदत करतात.
हे व्यासपीठ पर्जन्यमान, भूजल पातळी, भूजल उपलब्धता, जमिनीचा उतार आणि पाण्याचा निचरा यांसारख्या भौगोलिक माहितीचा वापर करते, ज्यामुळे संभाव्य पुनर्भरण क्षेत्रे शोधण्यात आणि योग्य उपाययोजनांचे नियोजन करण्यात मदत होईल.
पुनःभरण - भू-स्थानिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भूजल पुनर्भरण नियोजनाला चालना देणे.



* * *
आशिष सांगळे/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai