Posted On:
23 OCT 2026 6:52PM by PIB Mumbai
पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला एकेरीच्या एसयू-5 प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल तुलसिमती मुरुगेसन हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
तिच्या या कामगिरीमुळे भारतीय बॅडमिंटनची क्षेत्राची मान उंचावली, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. तिने यापुढेही परिश्रम करून यशाची नवनवी शिखरे गाठावीत आणि देशाचा गौरव वाढवावा, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने समाज माध्यम ‘एक्स’वरील एका संदेशात म्हटले आहे की,
पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेत महिला एकेरीच्या एसयू-5 प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल तुलसिमती मुरुगेसन हिचे अभिनंदन! तिची कामगिरी भारतीय बॅडमिंटनसाठी अभिमानाची बाब आहे. तिने यापुढेही परिश्रम घेत यशाची नवी शिखरे गाठावीत आणि देशाचा गौरव वाढवावा.
@पंतप्रधान नरेंद्र मोदी.
***
सुवर्णा बेडेकर/राज दळेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com