पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल रोहित कुमार याचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

Posted On: 21 OCT 2026 9:26PM by PIB Mumbai

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक एसबी4 प्रकारात उत्कृष्ट कालावधीची नोंद करत  कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रोहित कुमार याचे अभिनंदन केले.

पहिल्याच स्पर्धेत पदक जिंकणे हे या यशाचे विशेष महत्त्व असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. रोहित याने केलेल्या शानदार कामगिरीबद्दल त्यांनी त्याचे कौतुक केले.

पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे,

“रोहित कुमार याचे संस्मरणीय पदार्पण! आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक एसबी4 प्रकारात उत्कृष्ट कालावधीची नोंद करत  त्याने कांस्यपदक जिंकले आहे. पहिल्याच स्पर्धेत पदक जिंकल्यामुळे या यशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. रोहित याच्या शानदार कामगिरीबद्दल त्याचे अभिनंदन : पंतप्रधान @narendramodi”

***

NilimaChitale / NikhileshChitre / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2326478) अभ्यागत कक्ष : 7