पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सिमरन यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

Posted On: 21 OCT 2026 8:14PM by PIB Mumbai

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा  2026 मध्ये महिलांच्या 100 मीटर T12 प्रकारात उत्कृष्ट वेळेसह सुवर्णपदक जिंकल्याबद्दल आणि नवीन क्रीडा विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल सिमरन यांचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

मोदी यांनी नमूद केले की, तिचा वेग, दृढनिश्चय आणि क्रीडा नैपुण्याप्रति असलेली तिची निष्ठा खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान कार्यालयाने X वरील एका पोस्टमध्ये लिहिले आहे:

“आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा  2026 मध्ये महिलांच्या 100 मीटर T12 स्पर्धेत उत्कृष्ट वेळेसह सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सिमरनचे अभिनंदन! तिचा वेग, दृढनिश्चय आणि क्रीडा नैपुण्याप्रति असलेली तिची निष्ठा खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा: पंतप्रधान  @narendramodi"

***

Nilima Chitale / Rajashree Agashe / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2326343) अभ्यागत कक्ष : 4