पंतप्रधान कार्यालय
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल आयुष वर्मा याचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
Posted On:
21 OCT 2026 6:36PM by PIB Mumbai
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये आज पुरुषांच्या गोळाफेक F53 प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक जिंकणाऱ्या आयुष वर्माचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.
गोळाफेकमध्ये सुवर्णपदक आणि भालाफेकमध्ये कांस्यपदक अशी दोन पदके जिंकून आयुषने आपल्या पहिल्याच आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेतील मोहिमेची यशस्वी सांगता केली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आयुषची ही कामगिरी त्याची प्रतिभा, अष्टपैलुत्व आणि दृढनिश्चय यांचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगत पंतप्रधानांनी त्याच्या आगामी क्रीडा प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान कार्यालयाने ‘X’ या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे :
“2026 च्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या गोळाफेक F53 प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल आयुष वर्माचे अभिनंदन. गोळाफेकमध्ये सुवर्णपदक आणि भालाफेकमध्ये कांस्यपदक जिंकून आयुषने आपल्या पहिल्याच आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत दोन पदके मिळवली आहेत. त्याची प्रतिभा, अष्टपैलुत्व आणि दृढनिश्चय यांचे हे खरोखरच उत्कृष्ट उदाहरण आहे. त्याच्या आगामी क्रीडा प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा. PM @narendramodi”
***
Nilima Chitale / Madhuri Pange / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2326236)
अभ्यागत कक्ष : 6