पंतप्रधान कार्यालय
आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मधील महिला एकेरी क्लास 3 स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल सोनलबेन पटेलचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
20 OCT 2026 6:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर 2026
आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिला एकेरी क्लास 3 स्पर्धेत सोनलबेन पटेलने कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त करत तिचे अभिनंदन केले आहे.
सोनलबेन पटेलने आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धेतील आपल्या कामगिरीत पहिल्या वैयक्तिक पदकाची कमाई केली असल्याचा दखलपूर्ण उल्लेख पंतप्रधानांनी केला आहे. वर्षांनुवर्षांचे समर्पण, शिस्त आणि कठोर परिश्रमांमुळे तिच्या क्रीडा प्रवासातील हा विशेष क्षण शक्य झाला असल्याचे म्हणत त्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश,
"आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धेतील सोनलबेन पटेलच्या यशाने अतिशय आनंद झाला! तिने महिला एकेरी क्लास 3 स्पर्धेत कांस्य पदक जिंकले असून, आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धेतील आपल्या यशस्वी कामगिरीत पहिले वैयक्तिक पदक जोडले आहे. तिच्या क्रीडा प्रवासातील हा एक विशेष क्षण आहे. वर्षांनुवर्षांचे समर्पण, शिस्त आणि कठोर परिश्रमांमुळे हे शक्य झाले आहे: PM @narendramodi"
* * *
शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2325599)
अभ्यागत कक्ष : 5