Posted On:
19 OCT 2026 10:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर 2026
आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या लांब उडी टी 47 प्रकारात सुवर्णपदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषाद कुमार याचे अभिनंदन केले आहे. या स्पर्धेत पदार्पणातच सुवर्णपदक जिंकण्याची निषाद कुमार याची कामगिरी विशेष असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. निषाद कुमार याची अष्टपैलू कामगिरी, जिद्द आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेचे त्यांनी कौतुक केले. तसेच, त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
एक्स या सामाजिक माध्यमावरील एका संदेशात पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की,
"आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या लांब उडी टी 47 प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल निषाद कुमार याचा अभिमान वाटतो. या स्पर्धेत पदार्पणातच सुवर्णपदक जिंकल्यामुळे त्याचे यश आणखी खास ठरले आहे. त्याची जिद्द, विविध क्रीडा प्रकारांतील कौशल्य आणि उत्कृष्ट कामगिरी खरोखरच प्रेरणादायी आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा : PM @narendramodi”
* * *
शैलेश पाटील/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai