राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींनी विजयादशमीच्या पूर्वसंध्येला नागरिकांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 19 OCT 2026 8:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 ऑक्‍टोबर 2026

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विजयादशमीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

“विजयादशमीच्या शुभप्रसंगी, मी देश- परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा देत आहे.” असे राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

विजयादशमीच्या सणाला एक विशेष महत्त्व आहे. हा सण भगवान श्रीरामांनी रावणावर मिळविलेल्या विजयाचे प्रतीक आहे. भगवान श्रीरामांना धर्म आणि नैतिक आचरणाचे मूर्तिमंत रूप म्हणून त्यांचे पूजन केले जाते. हा सण अधर्म आणि अन्यायावर धर्म आणि न्याय यांच्या, विजयाचा उत्सव आहे.

भारतीय संस्कृती नीतिमत्ता आणि कर्तव्य यांच्या आदर्शांमध्ये रुजलेली आहे. या प्रसंगी, आपण आपल्या सांस्कृतिक परंपरांच्या उदात्त आदर्शांना जपण्याचा आणि सर्वसमावेशक समाज व विकसित भारताच्या उभारणीसाठी योगदान देण्याचा संकल्प करू या!

या पावन प्रसंगी, मी सर्व नागरिकांना त्यांच्या समृध्दी, उत्तम आरोग्य आणि कल्याणासाठी माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा देते.”

 

* * *

निलिमा चितळे/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2325291) अभ्यागत कक्ष : 9