उपराष्ट्रपती कार्यालय
संगीतकार देवा यांच्या निधनाबद्दल,उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला शोक
Posted On:
17 OCT 2026 6:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर 2026
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी प्रसिद्ध संगीतकार देवा यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
देवा यांनी आपल्या अनोख्या संगीत शैलीतून तसेच लोकांचे जीवन आणि भावना व्यक्त करणाऱ्या लोकप्रिय 'गान' संगितांमधून तमिळ चित्रपटसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती; असे आपल्या शोकसंदेशात उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे. देवा यांनी तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांतील 400 हून अधिक चित्रपटांना संगीत देऊन भारतीय चित्रपटसृष्टीतील संगिताला एक चिरस्थायी योगदान दिले होते, असेही त्यांनी पुढे नमूद केले आहे.
देवा यांच्या अविस्मरणीय रचना आणि 'गान' संगीतातील त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण योगदान संगीतप्रेमींच्या पिढ्यानपिढ्या जपून ठेवतील,असे उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे.संगीतकाराच्या निधनाने तमिळ चित्रपट आणि संगीत क्षेत्राची एक मोठी हानी झाली असल्याचेही त्यांनी पुढे म्हटले आहे.
सी. पी. राधाकृष्णन यांनी; देवा यांचे शोकाकुल कुटुंबीय,नातेवाईक,मित्र, चित्रपटसृष्टीतील सदस्य आणि संगीतप्रेमी यांच्याप्रती भावपूर्ण शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
* * *
राधिका अघोर/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2324736)
अभ्यागत कक्ष : 12