पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट


सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याबाबत उभय बाजूंकडून केली चर्चा

द्विपक्षीय संबंधांमधील सकारात्मक गतीचे मूर्त परिणामांमध्ये रूपांतर करण्याच्या महत्त्वावर पंतप्रधानांनी दिला भर

पंतप्रधानांनी पंतप्रधान मार्क कार्नी यांना दिल्या हार्दिक शुभेच्छा

Posted On: 14 OCT 2026 8:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2026

कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री, अनिता आनंद यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांनी व्यापार, विज्ञान आणि तंत्रज्ञान, संरक्षण, सुरक्षा, ऊर्जा, शिक्षण, लोकांचा- लोकांशी थेट संबंध आणि बहुपक्षीय सहकार्य यांसारख्या परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी आणि सहकार्य वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर चर्चा केली.

पंतप्रधानांनी द्विपक्षीय संबंधांमधील गती कायम ठेवण्याच्या आणि सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावरील  वाटाघाटी लवकरात लवकर पूर्ण करण्यासह, त्याचे मूर्त परिणामांमध्ये रूपांतर करण्याच्या महत्त्वावर भर दिला.त्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही विचारांची देवाणघेवाण केली.

पंतप्रधानांनी, कॅनडाचे पंतप्रधान कार्नी यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि पुढील भेटीगाठींसाठी उत्सुक असल्याचे सांगितले.


सुवर्णा बेडेकर/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2323602) अभ्यागत कक्ष : 8