कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आकांक्षी उमेदवारांच्या जोरदार मागणीनंतर 'इंडियास्किल्स 2026-27' च्या नोंदणीच्या मुदतीत 19 ऑक्टोबरपर्यंत वाढ

वर्ल्डस्किल्स शांघाय 2026 मधील पहिल्या 10 देशांमध्ये स्थान मिळवल्यानंतर 'टीम इंडिया'च्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या संवादानंतर युवकांमध्ये या स्पर्धेबाबत निर्माण झाला नवा उत्साह

Posted On: 13 OCT 2026 5:27PM by PIB Mumbai

आकांक्षी उमेदवार आणि संस्थांकडून अनेक विनंत्या प्राप्त झाल्यानंतर कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने (MSDE) 'इंडियास्किल्स स्पर्धा 2026-27'  साठी नोंदणीच्या मुदतीत 19 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढ केली आहे.

वर्ल्डस्किल्स स्पर्धा, शांघाय येथे 'टीम इंडिया'ने जागतिक स्तरावर 10 वे स्थान पटकावत सहा रौप्य पदके आणि  उत्कृष्टतेची पदके 20अशी चमकदार कामगिरी केल्यानंतर, कौशल्य स्पर्धांबद्दल वाढलेल्या नवीन उत्साहाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी 9 ऑक्टोबर 2026 रोजी नवी दिल्ली येथील 7, लोक कल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी वर्ल्डस्किल्स शांघाय 2026 मधील 'टीम इंडिया'च्या स्पर्धकांचे स्वागत करून त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर या उत्साहात आणखी वाढ झाली. त्यांच्या या संवादाने भारताच्या कुशल तरुणांच्या यशाचा बहुमान केला आणि राष्ट्रीय विकासात व्यावसायिक उत्कृष्टतेचे महत्त्व अधोरेखित केले.

 

या संवादानंतर, मंत्रालयाला संस्था आणि आकांक्षी उमेदवारांकडून 'इंडियास्किल्स  2026-27 ची नोंदणी पुन्हा सुरू करण्यासाठी अनेक विनंत्या प्राप्त झाल्या. याला प्रतिसाद म्हणून, नोंदणीची मुदत 19 ऑक्टोबर 2026 पर्यंत पुन्हा खुली करण्यात आली आहे, ज्यामुळे अधिक तरूण तज्ज्ञांना त्यांची कौशल्ये प्रदर्शित करण्याची, राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्याची आणि जागतिक मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी काम करण्याची संधी मिळणार आहे.

इंडियास्किल्स  2026–27 साठी आधीच अंदाजे 4 लाख उमेदवारांनी नोंदणी केली असल्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरवलेल्या मानकांनुसार तरुणांचा  आपली कौशल्ये दाखवण्यामधील आणि स्पर्धा करण्यामधील वाढता सहभाग दिसून येतो.  जे पात्र आकांक्षी उमेदवार आधी नोंदणी करू शकले नव्हते, त्यांना आता 19 ऑक्टोबर 2026 पर्यंत 'स्किल इंडिया डिजिटल हब' (SIDH) वर आपले अर्ज भरता येतील.

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या (MSDE) मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय कौशल्य विकास निगम (NSDC) च्या सहकार्याने आयोजित, 'इंडियास्किल्स  2026–27 ' मध्ये उत्पादन, अभियांत्रिकी, बांधकाम, डिजिटल तंत्रज्ञान, सर्जनशील उद्योग आणि सेवा यांसारख्या क्षेत्रांमधील  63    उद्योग-सुसंगत कौशल्य श्रेणींचा समावेश आहे.

ही स्पर्धा जिल्हा/विभाग, राज्य, प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावरील एक सुव्यवस्थित सुविधा उपलब्ध करून देत आहे, ज्यामुळे प्रतिभावान तरुणांना त्यांची कौशल्ये प्रदर्शित करता येतात.  तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळते आणि आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्याच्या संधींपर्यंत पोहोचता येते.

पुन्हा सुरू झालेल्या नोंदणीबाबत माहितीचा प्रसार करण्यासाठी आणि नोंदणी सुलभ करण्यासाठी मंत्रालयाने राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश प्रशासने, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), तंत्रनिकेतन (Polytechnics), महाविद्यालये, कौशल्य प्रशिक्षण संस्था आणि उद्योग भागीदारांना प्रोत्साहन दिले आहे. या अतिरिक्त संधीचा उद्देश सहभाग वाढवणे आणि अधिक आकांक्षी कौशल्य विजेत्यांना स्पर्धेत आणणे हा आहे.

वर्ल्डस्किल्स ल्योन  2024  मधील 13 व्या स्थानात सुधारणा करत 'टीम इंडिया'ने वर्ल्डस्किल्स शांघाय 2026 मध्ये 10 वे स्थान पटकावले, यामध्ये त्यांनी सहा रौप्य पदके आणि  उत्कृष्टतेची  20 पदके जिंकली. 63 कौशल्य प्रकारांमध्ये भारताचा 70 स्पर्धकांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा गट सहभागी झाला होता. त्यांच्या या कामगिरीने कौशल्ये, विशेष प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण तयारीमुळे तरुण भारतीयांसाठी निर्माण होणाऱ्या संधींकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे.

नोंदणी 19 ऑक्टोबर 2026 रोजी बंद होईल.

येथे नोंदणी करा: https://www.skillindiadigital.gov.in/india-skills-competition

***

Sonali Kulkarni / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2323001) अभ्यागत कक्ष : 6