रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय रेल्वेच्या मालवाहतुकीत सप्टेंबर 2025 च्या तुलनेत सप्टेंबर 2026 मध्ये 6.14% वाढ


एप्रिल-सप्टेंबर 2026 या कालावधीत एकूण मालवाहतुकीची गेल्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 4.1% वाढ

Posted On: 13 OCT 2026 1:00PM by PIB Mumbai

भारतीय रेल्वेने सप्टेंबर 2026 मध्ये मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक या दोन्हींमध्ये सातत्यपूर्ण वाढ नोंदवली आहे.  आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांतही मालवाहतुकीत सातत्यपूर्ण वाढ नोंदवली गेली असून ही वाढ अर्थव्यवस्थेच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये रेल्वे वाहतुकीची सततची मागणी दर्शवते.

मालवाहतुकीत 6.14% वाढ

भारतीय रेल्वेने सप्टेंबर 2026 मध्ये 135.35 दशलक्ष टन मालवाहतूक केली असून सप्टेंबर 2025 मध्ये ती  127.52 दशलक्ष टन होती.  यंदा गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 6.14 टक्के वाढ दिसून आली आहे. 

या महिन्यात अनेक प्रमुख घटकांच्या वाहतुकीत वाढ नोंदवली गेली. अन्नधान्याच्या मालवाहतूकीत 25 टक्के, क्लिंकरमध्ये 20 टक्के, देशांतर्गत कंटेनरच्या वाहतुकीत10 टक्के, कोळशात 9 टक्के, उर्वरित इतर वस्तूंमध्ये 8.2 टक्के, खनिज तेलात 6 टक्के, तयार पोलादात 5.5 टक्के आणि लोहखनिजाच्या वाहतुकीत  5.2 टक्क्यांनी वाढ झाली.

वीज केंद्रांना कोळशाचा अधिक पुरवठा 

भारतीय रेल्वेने सप्टेंबर 2026 मध्ये वीज केंद्रांना देशांतर्गत कोळशाचा पुरवठा वाढवला. सप्टेंबर 2025 मधील प्रति दिन 397 रेक्सच्या तुलनेत, प्रति दिन पुरवठा होणाऱ्या कोळशाच्या रेक्सची सरासरी संख्या वाढून 443 झाली, जी 11.6 टक्के वाढ दर्शवते.

सप्टेंबर 2026 मधील मालवाहतूक महसूल सप्टेंबर 2025 च्या तुलनेत ₹1,266 कोटींनी वाढला. यात 9.3 टक्के वाढ दिसून येते.

एकूण मालवाहतूक 833 दशलक्ष टनांच्या पुढे 

भारतीय रेल्वेने एप्रिल-सप्टेंबर 2026 दरम्यान एकूण 833.7 दशलक्ष टन मालवाहतूक केली असून मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यात 4.1 टक्के वाढ झाली आहे.  याच कालावधीतील मालवाहतूक महसुलात 3.7 टक्के वाढ नोंदवली गेली.

***

SonaliKulkarni / RajeshShirbhate / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2322770) अभ्यागत कक्ष : 7