संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्र्यांनी चेक प्रजासत्ताकचे पहिले उपपंतप्रधान आणि उद्योग व व्यापार मंत्री यांच्यासोबत केली द्विपक्षीय चर्चा

संरक्षण औद्योगिक सहकार्य वाढवण्यास दोन्ही बाजूंची सहमती

Posted On: 13 OCT 2026 1:16PM by PIB Mumbai

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 13 ऑक्टोबर 2026 रोजी नवी दिल्ली येथे चेक प्रजासत्ताकचे पहिले उपपंतप्रधान आणि उद्योग व व्यापार मंत्री कराल हॅव्हलिचेक यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी उभय देशांमधील संरक्षण औद्योगिक सहकार्याच्या संपूर्ण पैलूंचा आढावा घेतला. दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या सहकार्याचे आणि विविध संयुक्त उपक्रमांच्या यशस्वी आरंभाचे स्वागत केले, तसेच 'मेक-इन-इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत'ला प्रोत्साहन देण्यासाठी भारत-चेक संयुक्त संरक्षण समितीच्या माध्यमातून हे सहकार्य आणखी वाढवण्यास सहमती दर्शवली.



दोन्ही नेत्यांनी शांतता आणि सुरक्षेच्या सद्यस्थितीतील मुद्द्यांवरही चर्चा केली आणि प्रादेशिक स्थैर्य टिकवण्यासाठी अधिक सहकार्याची गरज असल्याचे मान्य केले. भारत आणि चेक प्रजासत्ताक यांच्यातील भागीदारी ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंधांवर तसेच परस्पर विश्वास व आदराच्या सामायिक मूल्यांवर आधारित असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.


हॅव्हलिचेक चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून विविध मंत्रालये, व्यापार आणि उद्योगांशी संवाद साधत आहेत. आपल्या दौऱ्यादरम्यान ते बंगळूर आणि मुंबई येथील विविध उद्योगांना भेट देणार आहेत.
 

***

Neha Kulkarni / Sonali Kulkarni / Madhura Nerurkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2322763) अभ्यागत कक्ष : 9