इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मसुरीमध्ये राष्ट्रीय सुशासन केंद्राच्या (NCGG) कार्यक्रमात भाषिणीच्या वापरामुळे पहिल्यांदाच बहुभाषिक एआय पोहोचले सीमापार

Posted On: 13 OCT 2026 11:08AM by PIB Mumbai

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय अंतर्गत असलेल्या डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन (DIC) च्या 'डिजिटल इंडिया भाषिणी विभागाने (DIBD)' मसुरी येथे 12 ते 23 ऑक्टोबर 2026 दरम्यान आयोजित राष्ट्रीय सुशासन केंद्राच्या (NCGG) 'शहरी सेवा वितरण' या विषयावरील बहुराष्ट्रीय सनदी अधिकाऱ्यांच्या क्षमता उभारणी कार्यक्रमात रिअल-टाइम बहुभाषिक संवादाची सुविधा उपलब्ध करून दिली. परराष्ट्र मंत्रालय (MEA) द्वारे प्रायोजित असलेला हा कार्यक्रम, भारतीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य (ITEC) उपक्रमांतर्गत भारत सरकारच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाच्या  द्वारे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात पेरू, कंबोडिया, नायजेरिया, केनिया, पॅलेस्टाईन, लेबनॉन, द गॅम्बिया, इक्वाडोर आणि स्पेन यांसारख्या विविध देशांतील सनदी अधिकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील प्रतिनिधी एकत्र आले आहेत. यामुळे प्रशासकीय कार्यपद्धती आणि शहरी सेवा वितरणातील आंतरराष्ट्रीय अनुभव तसेच उत्कृष्ट पद्धतींच्या देवाणघेवाणीसाठी एक महत्त्वपूर्ण मंच उपलब्ध झाला आहे.

 

या कार्यक्रमाचा भाग म्हणून, भाषिणीने आपल्या 'श्रुतलेख' (Shrutlekh) प्लॅटफॉर्मचा वापर करून प्रास्ताविक सत्रादरम्यान इंग्रजी आणि स्पॅनिश भाषांमध्ये रिअल-टाइम भाषांतराची सुविधा दिली. या प्लॅटफॉर्मने इंग्रजी ते स्पॅनिश आणि स्पॅनिश ते इंग्रजी अशा दोन्ही बाजूंनी भाषांतराला पाठबळ दिले, ज्यामुळे भाषेचे अडथळे दूर होऊन आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना एकमेकांशी अधिक प्रभावीपणे संवाद साधणे आणि कार्यक्रमात सहभागी होणे शक्य झाले.

भाषिणी टीमने सहभागींना श्रुतलेख प्लॅटफॉर्म वापरण्यास मदत केली आणि त्यांना भाषिणी परिसंस्था , तिची बहुभाषिक AI क्षमता आणि आरोग्य, वित्त, कृषी व सार्वजनिक सेवा वितरण यांसारख्या विविध क्षेत्रांतील तिच्या संभाव्य उपयोगांची माहिती दिली. याशिवाय, दैनंदिन संवाद आणि डिजिटल परस्परसंवादातील भाषेचे अडथळे दूर करण्यासाठी सहभागींना भाषिणी मोबाईल ॲप आणि त्यातील वैशिष्ट्ये वापरून पाहण्यास प्रोत्साहित करण्यात आले.

***

SushamaKane / ShaileshPatil / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2322760) अभ्यागत कक्ष : 12