युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ब्रिक्स देशांच्या प्रदर्शनीय सामन्यांच्या पारंपरिक आणि स्वदेशी क्रीडास्पर्धा 2026 अंतर्गत अहमदाबाद येथे क्रीडा वारसा आणि सांस्कृतिक वैविध्याचा सोहळा


भारत भविष्यासाठी सज्ज क्रीडा पायाभूत सेवा सुविधांमध्ये गुंतवणूक करुन क्रीडा क्षेत्राला राष्ट्र उभारणीच्या केंद्रस्थानी ठेवत आहे : केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहारमंत्री मनसुख मांडविया

Posted On: 12 OCT 2026 9:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2026

गुजरात मध्ये अहमदाबाद येथील नारनपुरा मधील वीर सावरकर क्रीडा संकुलामध्ये 12 ऑक्टोबर 2026 रोजी ब्रिक्स देशांची प्रदर्शनीय सामन्यांची पारंपरिक आणि स्वदेशी क्रीडा स्पर्धा 2026 आयोजित करण्यात आली.

संपूर्ण दिवसभर चाललेल्या या स्पर्धेनिमित्त अनेक मान्यवर, विविध देशांची शिष्टमंडळे, खेळाडू, संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ, तांत्रिक अधिकारी आणि भागीदार संस्था एकत्र आल्यामुळे  सहभागी देशांचा समृद्ध क्रीडा वारसा साजरा करतानाच परस्पर सामंजस्य वाढविणे, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि ब्रिक्स देशांच्या नागरिकांमधील मजबूत बंध यासाठी ही स्पर्धा एक वैशिष्ट्यपूर्ण मंच ठरली.

क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करताना केंद्रीय युवा व्यवहार मंत्री डॉ. मनसुख मांडविया म्हणाले की, भविष्यासाठी सज्ज अशा क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करून भारत राष्ट्रनिर्मितीत खेळांना केंद्रस्थानी ठेवत आहे.

गुजरातचे माननीय उपमुख्यमंत्री  हर्ष संघवी यांच्या सन्माननीय उपस्थितीत केंद्रीय मंत्र्यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

ब्रिक्स (BRICS) समूहातील 10 देशांचे प्रतिनिधी आणि इतर उपस्थितांना संबोधित करताना, केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी क्रीडा-प्रधान राष्ट्र घडवण्याबाबतच्या भारताच्या कटिबद्धतेवर प्रकाश टाकला.

सहभागी देशांनी या स्पर्धेत त्यांच्या वैविध्यपूर्ण पारंपरिक आणि  स्वदेशी खेळांचे आणि संस्कृतीचे सादरीकरण केले.

बेलारुस – गोरोड्की

बोलिविया – लुचा डी चोलितास, टिंकू, रायुला, ट्रोम्पो, कचिनास आणि  करेरा डी साकोस

ब्राझील – झरबटना (स्वदेशी ब्लोपाइप), कोरिडा डी तोरस (लॉग रेस), ब्राझिलियन पॅरा-जिउ-जित्सु आणि कॅपोरिया

चीन – वुशु, लायन डान्स आणि  हेल्थ क्विगाँग

भारत – मल्लखांब, योगासने, कलरीपयट्टू

इराण – झूरकानेह, हफ्त सँग व घानेइ

कझाकस्तान – असिक अटु, टोग्झकुमलक आणि  कझाक कुरेसी

रशिया – गोरोडकी आणि  साम्बो

दक्षिण अफ्रिका – क्गती आणि  लिन्टोन्गा

संयुक्त अरब अमिराती – अल तब्बाह

या क्रीडास्पर्धांना सांस्कृतिक सादरीकरण आणि प्रेक्षकांचा सहभाग असलेल्या काही उपक्रमांची जोड मिळाली. सहभागी टीम्सना कार्यक्रमाच्या सांगता समारंभात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या क्रीडास्पर्धांमुळे ब्रिक्स सदस्य राष्ट्रांना त्यांचा ऐतिहासिक ठेवा, आदर्श, सांस्कृतिक संदर्भ आणि त्यांच्या पारंपरिक खेळांमधील वैविध्यपूर्ण पद्धती सादर करण्यासाठी एक सामायिक व्यासपीठ मिळाले.

क्रीडा क्षेत्राचे आधुनिकीकरण करताना सामुदायिक ज्ञानाचे जतन करणे, सर्वसमावेशक सहभाग वाढवणे आणि ब्रिक्स कुटुंबातील मैत्री आणि सहकार्याचे बंध दृढ करण्याचे महत्त्व या कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

 

शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


 

 

 


(Release ID: 2322548) अभ्यागत कक्ष : 3