कोळसा मंत्रालय
देशातील औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांमधील कोळशाचा साठा 18 दशलक्ष टन हून अधिक पातळीवर स्थिर असून ऑक्टोबर 2026 मध्ये कोळशाच्या पुरवठ्यात वाढ झाल्यामुळे वीज प्रकल्पांमधील साठा कमी होण्याचा वेग लक्षणीयरीत्या मंदावला.
Posted On:
12 OCT 2026 10:00AM by PIB Mumbai
कोळशावर आधारित देशांतर्गत औष्णिक वीज प्रकल्पांमधील कोळशाचा साठा 29 सप्टेंबर 2026 पासून 18 दशलक्ष टन (MT) पेक्षा जास्त पातळीवर स्थिर आहे. 29 सप्टेंबर 2026 रोजी हा साठा 18.932 दशलक्ष टन होता तर 10 ऑक्टोबर 2026 रोजी तो 18.205 दशलक्ष टन होता. औष्णिक वीज प्रकल्पांमधील कोळशाची दैनंदिन मागणी आणि होणारा कोळशाचा पुरवठा यांच्यात तफावत नसल्याचे या स्थिर साठ्यातून दिसून येते तसेच कमी साठा असलेल्या प्रकल्पांच्या कोळशाच्या पुरवठ्यावर देखील बारकाईने देखरेख ठेवली जात आहे, संवेदनशील केंद्रांना कोळशाचा नियमित आणि योग्य प्रमाणात पुरवठा व्हावा तसेच अखंड वीज निर्मिती सुनिश्चित करण्यासाठी गरजेनुसार कोळशाचे पुनर्वितरण केले जाते.
ऑक्टोबर 2026 मध्ये दोन तारखांना साठ्यात वाढ नोंदवण्यात आली:
- 2 ऑक्टोबर 2026: 0.024 दशलक्ष टन
- 10 ऑक्टोबर 2026: 0.017 दशलक्ष टन
वीज प्रकल्पांमधील साठा कमी होण्याचा वेग सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर मध्ये मंदावला आहे.
- सप्टेंबर 2026 मध्ये कोळशाच्या साठ्यात एकूण 7.28 दशलक्ष टन घट झाली होती, म्हणजेच दररोज सरासरी 0.24 दशलक्ष टन साठा कमी होत होता.
- ऑक्टोबर 2026 च्या पहिल्या दहा दिवसांमध्ये एकूण साठ्यात केवळ 0.56 दशलक्ष टन इतकी घट झाली, म्हणजे सरासरी घट 0.06 दशलक्ष टन प्रतिदिन इतकी होती.
रेल्वे रेक्सच्या वाढीव लोडिंगमुळेच कोळशाच्या पुरवठ्यात ही मोठी सुधारणा झाली आहे. ऑक्टोबर 2026 (1–10 ऑक्टोबर),मध्ये ऊर्जा क्षेत्रासाठी वापरलेल्या रेक्सचे प्रमाण सप्टेंबर 2026 मधील 426 च्या तुलनेत सरासरी 469 प्रतिदिन इतके होते. ही वाढ सुमारे 10% आहे. ऑक्टोबरमध्ये दररोजच्या रेक लोडिंगचे प्रमाण 447 ते 482 रेक्सच्या दरम्यान राहिले आहे.

या सर्वांचा परिणाम म्हणून ऊर्जा क्षेत्राला होणाऱ्या प्रत्यक्ष कोळसा पुरवठ्याचे प्रमाण सप्टेंबर 2026 मधील 2.21 दशलक्ष टनांच्या तुलनेत ऑक्टोबर 2026 मध्ये सरासरी प्रतिदिन 2.49 दशलक्ष टन इतके होते. 26 ऑक्टोबर (10.10.2026 पर्यंत) कालावधीतील प्रत्यक्ष कोळसा पुरवठा हा दररोज 2.37 दशलक्ष टन इतक्या नियोजित पुरवठ्यापेक्षा अधिक आहे आणि दहापैकी नऊ दिवस पुरवठ्याने नियोजित प्रमाणापेक्षा अधिक पातळी गाठली आहे.
कोळसा मंत्रालय, रेल्वे मंत्रालय आणि ऊर्जा मंत्रालय यांच्याशी निकटचा समन्वय साधून पुरवठा आणि लॉजिस्टिक्सवर सक्रियपणे लक्ष ठेवत आहे, जेणेकरून देशात कुठेही कोळशाच्या उपलब्धतेमुळे वीज निर्मितीत अडथळा येणार नाही हे सुनिश्चित होईल.
कोळशाची अखंडित वाहतूक आणि पुरवठा सुनिश्चित करून औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा पुरेसा साठा राखण्यासाठी, मंत्रालय 'कोल इंडिया लिमिटेड' (CIL), SCCL, रेल्वे मंत्रालय आणि वीज कंपन्या यांच्याशी निकटचा समन्वय राखून काम करत आहे.
कोळशाची कार्यक्षम वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाचा सातत्यपूर्ण पाठिंबा आणि व्यावसायिक वचनबद्धता याबद्दल कोळसा मंत्रालय सदैव कृतज्ञ आहे.
***
SushamaKane / BhaktiSontakke / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2322102)
अभ्यागत कक्ष : 9