पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुलभ, विश्वासाधारित कर प्रशासनासाठी जीएसटी परिषदेने केलेल्या शिफारसींचे स्वागत केले आहे
Posted On:
08 OCT 2026 9:50PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी परिषदेने मंजूर केलेल्या जीएसटी सुधारणांच्या नवीन शिफारसींचे स्वागत केले असून या शिफारसी म्हणजे वस्तू आणि सेवा कर अधिक सुलभ, कार्यक्षम आणि नागरिक स्नेही करण्यातील एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे.अटक करण्याची तरतूद रद्द करणे, अधिक प्रमाणात गुन्हेगारीकरण कमी करणे आणि कार्यपद्धती सुलभ करणे यांसंदर्भातील तरतुदींचा विशेष उल्लेख करुन जीएसटी परिषदेच्या या शिफारसींमुळे करदाते आणि व्यावसायिकांसाठी अधिक सकारात्मक वातावरण निर्माण होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:
जीएसटी परिषदेने मंजूर केलेल्या जीएसटी सुधारणांच्या नव्या टप्प्याचे मी स्वागत करतो.
अटक करण्याची तरतूद रद्द करणे, अधिक प्रमाणात गुन्हेगारीकरण कमी करणे आणि कार्यपद्धती सुलभ करणे यांसंदर्भातील परिषदेच्या उपाययोजनांचा अतिशय सकारात्मक परिणाम होईल.
हेतू स्पष्ट आहे:
जलद निर्णय
अनुपालन खर्चात कपात
स्वयंचलित परतावे.
विश्वासावर आधारित प्रशासन.
जीएसटीला अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिक स्नेही बनवण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांशी या उपाययोजना सुसंगत आहेत.
***
Neha Kulkarni / Bhakti Sontakke / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2321481)
अभ्यागत कक्ष : 5
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam