पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

सरकारचे प्रमुख म्हणून देशसेवेची 25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताकच्या पंतप्रधानांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली कृतज्ञता

Posted On: 08 OCT 2026 7:29PM by PIB Mumbai

सरकारचे प्रमुख म्हणून देशसेवेची 25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताकच्या पंतप्रधान महामहीम कमला प्रसाद-बिसेसर यांनी दिलेल्या स्नेहपूर्ण शुभेच्छांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
भारत आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो यांच्यातील मैत्री नवनवीन उंची गाठत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आणि आगामी काळात दोन्ही देश आपली भागीदारी अधिक दृढ करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मोदी यांनी 'एक्स' वर पोस्ट केले:
"पंतप्रधान कमला प्रसाद-बिसेसर, आपल्या हार्दिक शुभेच्छा आणि स्नेहमय  शब्दांबद्दल धन्यवाद. भारत आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो यांच्यातील मैत्री नवनवीन उंची गाठत आहे. आगामी काळात आपली भागीदारी अधिक दृढ करण्यास आम्ही उत्सुक आहोत.

***

Neha Kulkarni / Sushama Kane / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2321345) अभ्यागत कक्ष : 4