पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महिला आणि बाल विकास याविषयीच्या विभागीय शिखर परिषदेच्या 9 ऑक्टोबरला होणाऱ्या समारोप सत्राला पंतप्रधान संबोधित करणार


पोषण, बालशिक्षण, बालसंरक्षण, महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण या प्रमुख विषयांवर या शिखर परिषदेत लक्ष केंद्रित केले जाणार

Posted On: 08 OCT 2026 7:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 4:30 च्या सुमारास नवी दिल्लीतील सुषमा स्वराज भवन येथे आयोजित केलेल्या महिला आणि बाल विकास विभागीय शिखर परिषदेच्या समारोप सत्रात सहभागी होणार आहेत. या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.

8-9 ऑक्टोबर 2026 या दोन दिवस चालणाऱ्या या विभागीय शिखर परिषदेत सर्व राज्यांमधील राजकीय नेतृत्व तसेच महिला व बाल विकास क्षेत्राशी संबंधित अधिकारी सहभागी होतील.सहकारी संघराज्यवाद  मजबूत करणे, राष्ट्रीय प्राधान्यक्रमांच्या सामूहिक स्वामित्वाची जोपासना आणि केंद्र-राज्य यांच्यातील घनिष्ठ सहकार्यातून परिणामांना गती देणे या उद्देशाने पंतप्रधानांनी संकल्पित केलेल्या विभागीय शिखर परिषदांच्या मालिकेतील ही दुसरी परिषद आहे.

या शिखर परिषदेत चार विषयांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.:

1. उत्तम पोषण आणि प्राथमिक शिक्षण यासाठी अंगणवाडी केंद्रांच्या संकल्पनांची पुनर्मांडणी करणे 

2.असुरक्षित मुलांसाठी संरक्षण प्रणाली मजबूत करणे

3.संस्थात्मक आणि कायदेशीर चौकटींच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे महिलांचे संरक्षण करणे 

4.योजनांची परिणामकारकता आणि प्रसार करून महिला सक्षमीकरण साध्य करणे.

विभागीय प्राधान्यक्रमांवर विचारविनिमय, चांगल्या पद्धतींची देवाणघेवाण, अंमलबजावणीतील आव्हानांचा सामना आणि प्रशासन आणि सेवा वितरण यासाठी कालमर्यादेतील कृतींवर सहमती यासाठी विचार विमर्श करण्यासाठी ही विभागीय शिखर परिषद केंद्र आणि राज्य सरकारांमधील हितधारकांना एकत्र आणत आहे.


निलिमा चितळे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2320942) अभ्यागत कक्ष : 5