आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा उद्या भारत मंडपम येथे ‘जोश टीम्स’ अर्थात आरोग्यासाठी संयुक्त चमूंच्या राष्ट्रीय शुभारंभाचे नेतृत्व करणार
केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडविया, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता जोश टीम्सच्या राष्ट्रीय शुभारंभास उपस्थित राहणार
टीबी मुक्त भारतासाठी युवकांच्या नेतृत्वाखाली समुदायांना एकत्र आणणारी मोहीम बळकट करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 11 राज्यांतील 55 जिल्ह्यांमध्ये जोश टीम्स तैनात केल्या जाणार
जोश टीम्स टीबी मुक्त भारताचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवणार; प्रथम श्रेणी अधिकारी, माय भारत स्वयंसेवक आणि एनसीसी कॅडेट्स समुदायांच्या सहभागाला चालना देणार
Posted On:
07 OCT 2026 4:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2026
भारतातील क्षयरोग (टीबी) विरोधी लढा अधिक मजबूत करण्यासाठी आणि या मोहिमेत समुदायाचा सहभाग वाढवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय तसेच संरक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने 8 ऑक्टोबर 2026 रोजी भारत मंडपम, नवी दिल्ली येथे जोश (Joint Squad for Health) टीम्स अर्थात आरोग्यासाठी संयुक्त चमूंचा शुभारंभ करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात, ही मोहीम 11 राज्यांतील 55 जिल्ह्यांमध्ये लागू केली जाईल. युवकांच्या नेतृत्वाखाली समुदायांना सहभागी करणाऱ्या मोहिमेला बळकट करणे आणि टीबी मुक्त भारताचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि रसायन व खते मंत्री जगत प्रकाश नड्डा; केंद्रीय कामगार व रोजगार आणि युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया; संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या उपस्थितीत जोश टीम्सचा राष्ट्रीय शुभारंभ करतील. या कार्यक्रमात सहभागी मंत्रालयांचे वरिष्ठ नेतृत्व आणि भागधारक, लोकप्रतिनिधी, प्रधम वर्ग- अधिकारी, माय भारत स्वयंसेवक, एनसीसी कॅडेट्स आणि भारताच्या टीबी निर्मूलन प्रयत्नांशी जोडलेले इतर भागधारक एकत्र येतील.

या कार्यक्रमात टीबी मुक्त भारत अभियानाच्या प्रमुख टप्प्यांवर प्रकाश टाकणारा आणि या अभियानाचे यश दाखवणारा एक व्हिडिओ प्रदर्शित केला जाईल, त्यानंतर जोश टीम्सचा औपचारिक शुभारंभ होईल. तसेच, टीबी मुक्त भारत अभियानासाठी नवीन माहिती, शिक्षण आणि संवाद साहित्याचे प्रकाशन केले जाईल. याशिवाय, सार्वजनिक जागरूकता, समुदाय सहभाग आणि टीबी निर्मूलनाच्या राष्ट्रीय प्रयत्नांमधील सहभाग अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने 'खुशी अवतार' या एआय-आधारित चॅटबॉटचा शुभारंभ देखील या कार्यक्रमात करण्यात येईल.
तळागाळात टीबी प्रति जनजागृतीसाठी युवकांचा पद्धतशीर सहभाग
टीबी निर्मूलनासाठी भारतातील युवकांची ऊर्जा आणि त्यांची व्यापक पोहोच याचे संघटित सामाजिक कार्यात रूपांतर करण्यासाठी 'जोश' टीम्सची रचना एका पद्धतशीर यंत्रणेच्या रूपात करण्यात आली आहे. या टीम्स प्रथम वर्ग अधिकारी, माय भारत स्वयंसेवक आणि एनसीसी कॅडेट्स यांना एकत्र आणतील; ज्यामुळे प्रशासकीय नेतृत्व तसेच माय भारत आणि एनसीसीचे नेटवर्क व समुदाय सहभाग क्षमता यांचा मेळ घातला जाईल.
पहिल्या टप्प्यात, हा उपक्रम तालुके/प्रभाग आणि समुदाय स्तरावर सहभाग वाढविण्यावर लक्ष केंद्रित करेल. यामुळे टीबी मुक्त भारताचा संदेश आरोग्य सुविधांच्या पलीकडे नेऊन लोक जिथे राहतात, काम करतात आणि एकत्र येतात अशा ठिकाणी थेट समुदायांपर्यंत पोहोचवला जाईल.
'जोश' (क्षयरोग निर्मूलनासाठी तयार करण्यात आलेले विशेष पथक) (JOSH) पथके जनसंपर्क आणि सहभागाच्या माध्यमातून क्षयरोगाची लक्षणे, प्रतिबंध, वेळेवर निदान आणि उपचार पूर्ण करण्याबाबतचे महत्त्वाचे संदेश पोहोचवण्यास मदत करतील. तसेच, क्षयरोगाबाबतचे गैरसमज दूर करणे, हा रोग म्हणजे एक सामाजिक लांछन आहे ही भावना कमी करणे आणि मोहिमेत व्यक्ती, कुटुंबे व समुदायांना राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलनाच्या चळवळीत सक्रियपणे सहभाग घेण्यास प्रोत्साहित करण्याच्या प्रयत्नांमध्ये देखील योगदान देतील.
या उपक्रमाचा उद्देश, क्षयरोग निर्मूलनाच्या प्रयत्नांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यास सक्षम बनवणे हा आहे. जनजागृती, सामाजिक संघटन आणि सामुदायिक सहभाग यात योगदान देण्यासाठी त्यांना एक ठोस व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येईल. यात, प्रथम श्रेणीचे अधिकारी, ‘माय भारत’ स्वयंसेवक तसेच राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) चे छात्र यांचा एकत्रित सहभाग असेल, त्यामुळे सरकारी योजना आणि तळागाळातील समुदाय यांच्यातील दुवा अधिक मजबूत होईल.
लोकसहभागच्या सामर्थ्याच्या पायावर
'JOSH Teams' हा उपक्रम भारताच्या क्षयरोग निर्मूलन प्रयत्नांमधील महत्त्वाचे आधारस्तंभ असलेल्या 'लोकसहभाग' आणि 'जनभागीदारी' यांवर विशेषकरून आधारित आहे. 2025 मध्ये, 697 जिल्ह्यांमधील 67,933 पंचायतींना 'क्षयरोगमुक्त' म्हणून मान्यता देण्यात आली; आरोग्य कर्मचारी, लोकप्रतिनिधी, नागरिक आणि स्वयंसेवक यांनी राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलनाच्या उद्दिष्टाला पुढे नेण्यासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचेच द्योतक आहे.
हे यश, क्षयरोग निर्मूलनाचा संदेश अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी स्थानिक नेतृत्व, समुदायाचा सहभाग आणि मालकीहक्क आणि सातत्यपूर्ण सहभाग यांचे महत्त्व अधोरेखित करते. तरुणांची ऊर्जा, त्यांचा समाजात असलेल्या व्यापक संपर्क आणि संबंधांचा उपयोग करून क्षयरोग निर्मूलनाच्या प्रयत्नांमधील जनजागृती, लोकसहभाग आणि सामुदायिक सहभागाला अधिक चालना देते.
संपूर्ण शासन आणि संपूर्ण समाज दृष्टिकोन
'JOSH' पथके ही आरोग्य, युवा आणि संरक्षण क्षेत्रांतील संस्थात्मक क्षमता आणि आरोग्य विस्तार सेवांच्या व्यापक यंत्रणांना एकत्र आणून, क्षयरोग निर्मूलनासाठी शासनाचा 'सर्व-शासकीय' आणि 'सर्व-समावेशक' दृष्टिकोणाचे प्रतिनिधित्व करतात.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय सार्वजनिक आरोग्य आणि क्षयरोग निर्मूलनासाठीची सर्वसमावेशक रूपरेषा उपलब्ध करून देते; तर युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय तसेच संरक्षण मंत्रालय अनुक्रमे 'माय भारत' (MY Bharat) स्वयंसेवक आणि एनसीसी (NCC) कॅडेट्सना समुदाय पातळीवरील लोकजागृती आणि लोकसंपर्क मोहिमांमध्ये सहभागी होण्यासाठी सहकार्य करेल.
या उपक्रमातून शासनाचा, विविध मंत्रालये आणि क्षेत्रांमध्ये समन्वय साधण्यावर असलेला सातत्यपूर्ण भर दिसून येतो, ज्यामुळे विविध संस्थात्मक आणि सामाजिक जाळ्यांना एका सामायिक राष्ट्रीय उद्दिष्टासाठी आपले योगदान देणे शक्य होते.
जोश (JOSH) टीम्सची सुरुवात हे सरकारच्या क्षयरोगाविरुद्धच्या लढाईत लोकांचा सहभाग वाढवण्याच्या आणि समुदायाला एकत्र आणण्याच्या प्रयत्नांमधील आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामध्ये विविध मंत्रालये, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, आरोग्य कर्मचारी, लोकप्रतिनिधी, तरुण वर्ग आणि नागरिक यांच्या समन्वित कृतीचा समावेश आहे.
तळागाळातील समाजाचा अधिक व्यापक आणि कृतिशील सहभाग आणि मोठ्या प्रमाणातील लोकसहभागाच्या माध्यमातून, जोश (JOSH) संघ 'क्षयरोगमुक्त भारत' घडवण्याचा सामूहिक संकल्प अधिक दृढ करतील.
सुषमा काणे/शैलेश पाटील/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2320151)
अभ्यागत कक्ष : 15