पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि जपानने संयुक्त क्रेडिटिंग यंत्रणेच्या कार्यनियमावलीचे केले अनावरण

Posted On: 05 OCT 2026 9:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2026

​भारतातील जपानचे राजदूत केईची ओनो आणि पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाचे तत्कालीन सचिव तन्मय कुमार यांनी नवी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात भारत जपान संयुक्त क्रेडिटिंग यंत्रणेच्या कार्यनियमावलीचे संयुक्तपणे अनावरण केले. हा कार्यक्रम 30 सप्टेंबर 2026 रोजी झाला.

​भारत आणि जपानमधील या संयुक्त क्रेडिटिंग यंत्रणेमुळे भारतातील प्रगत अल्प कार्बन उत्सर्जन तंत्रज्ञानाच्या वापराला गती मिळणार आहे. याशिवाय हवामान बदलाशी लढण्यासाठी निधी उभारणे, तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देणे आणि कार्बन उत्सर्जनात घट साध्य करण्याच्या प्रयत्नांना बळ देणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. या यंत्रणेमुळे आंतरराष्ट्रीय कार्बन बाजारपेठेत पारदर्शकता आणि विश्वास निर्माण करण्यासोबतच भारतातील शाश्वत विकासासाठीही योगदान  लाभणार आहे.

​दोन्ही देशांमध्ये 7 ऑगस्ट 2025 रोजी सहकार्य करार झाला होता, तर 8 जून 2026 रोजी त्याची अंमलबजावणी नियमावली स्वीकारण्यात आली होती. त्यानंतर पॅरिस करारातील कलम 6.2 अंतर्गत द्विपक्षीय सहकार्याला प्रत्यक्ष सुरुवात करण्याच्या दृष्टीने या नियमावलीचे अनावरण हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

​या नियमावलीमुळे आता संस्थात्मक उभारणीची तयारी पूर्ण होऊन प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात होऊ शकणार आहे. तसेच या उपक्रमांतर्गत काम करण्यासाठी एक स्पष्ट, पारदर्शक आणि सर्वसमावेशक नियमावलीही अस्तित्वात आली आहे. प्रकल्पाचा प्राथमिक प्रस्ताव सादर करण्यापासून ते अंतिम क्रेडिट्स मंजूर करून ते देण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्याची सविस्तर माहिती या नियमावलीत देण्यात आली आहे.


निलिमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2319412) अभ्यागत कक्ष : 13