जलशक्ती मंत्रालय
गांधी जयंतीनिमित्त विशेष ग्रामसभेचा एक भाग म्हणून जल जीवन मिशन 2.0 अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा व्यवस्था बळकट करण्यासाठी 1,850 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये जल अर्पण सोहळा साजरा
Posted On:
03 OCT 2026 5:16PM by PIB Mumbai
गांधी जयंती आणि विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयोजित विशेष ग्रामसभांचे औचित्य साधून, 1,850 पेक्षा जास्त ग्रामपंचायती/गावांमध्ये 'जल अर्पण' सोहळा साजरा झाला. 'जल अर्पण' ही जल जीवन मिशन 2.0 अंतर्गत एक मुख्य सुधारणा आहे जी ग्रामीण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था थेट स्थानिक लोकांच्या हाती सोपवते. या सोहळ्याद्वारे पूर्ण झालेल्या ग्रामीण पाणीपुरवठा योजना अधिकृतपणे ग्रामपंचायती आणि ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समित्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या. पाणीपुरवठा व्यवस्थापन लोकांच्या हाती सोपवणे आणि पाण्याचा शाश्वत पुरवठा करणे, हा या मिशनचा बदलता दृष्टिकोन या पावलामुळे स्पष्ट दिसून येतो."

जल अर्पण मॉड्युलमुळे पात्र ग्रामपंचायती आणि गावांसाठी प्रादेशिक भाषांमध्ये पहिल्यांदाच 'हर घर जल' प्रमाणपत्रे तयार करणे शक्य झाले आहे. या अंतर्गत पात्र ग्रामपंचायती आणि गावांसाठी 346 'हर घर जल' प्रमाणपत्रे प्रादेशिक भाषांमध्ये तयार करून ती जारी करण्यात आली. यामुळे ही प्रमाणपत्र प्रक्रिया अधिक सुलभ आणि लोकाभिमुख झाली आहे, तसेच पेयजल सेवांवरील स्थानिक समुदायाची मालकी दृढ झाली आहे. जल अर्पण मॉड्युलमध्ये आता हिंदी, इंग्रजी आणि इतर 17 प्रादेशिक भाषांमध्ये 'हर घर जल' प्रमाणपत्रे तयार करण्याची सोय उपलब्ध आहे. यामध्ये आसामी, बंगाली, बोडो, गुजराती, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलगू आणि उर्दू या भाषांचा समावेश आहे. यामुळे स्थानिक लोकांना कार्यक्रमाची माहिती आणि प्रमाणपत्रे त्यांच्या स्वतःच्या भाषेत मिळवणे शक्य झाले आहे.

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी पिण्याच्या पाण्याच्या सेवा सुरक्षित आणि विश्वासार्ह राहाव्यात यासाठी पाण्याच्या शुद्धतेवर देखरेख व नियंत्रण ठेवणे आणि पावसाळ्यानंतर पाण्याच्या स्रोतांचा दर्जा तपासणे यासारख्या महत्त्वाच्या उपाययोजना केल्या. महिलांच्या सक्रिय सहभागातून स्थानिकांच्या नेतृत्वाखालील पाणी दर्जा नियंत्रण अधिक कार्यक्षम केले जात आहे.


'जल अर्पण' सोहळा साजरा करणे हे महात्मा गांधी यांच्या सामुदायिक सहभाग स्थानिक स्वराज्य आणि सामूहिक जबाबदारीच्या विचारसरणीला सुसंगत आहे. यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या सेवा टिकवून ठेवण्यात आणि दीर्घकालीन पाणी सुरक्षा देण्यात ग्रामपंचायती आणि ग्रामीण समुदाय मध्यवर्ती भूमिका बजावत आहेत.
***
सुषमा काणे/प्रज्ञा जांभेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2318705)
अभ्यागत कक्ष : 7