पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 80 किलो बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून अंकुशचे अभिनंदन
Posted On:
02 OCT 2026 6:13PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या 80 किलो बॉक्सिंगच्या अंतिम सामन्यात दमदार विजय मिळवत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अंकुशचे अभिनंदन केले आहे.
अंकुशची जिद्द आणि समर्पण उल्लेखनीय असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताची बॉक्सिंग मोहीम शानदार कामगिरीसह संपुष्टात आणण्यात अंकुशच्या यशामुळे भर पडली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान कार्यालयाने ‘X’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे;
“अंकुशला सुवर्णपदक! आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या 80 किलो बॉक्सिंगमध्ये अंतिम सामन्यात दमदार विजय मिळवत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अंकुशचे अभिनंदन. त्याची जिद्द आणि समर्पण उल्लेखनीय आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताची बॉक्सिंग मोहीम शानदार कामगिरीसह संपवण्यात त्याच्या यशामुळे भर पडली आहे: पंतप्रधान @narendramodi”
***
शैलेश पाटील/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2318512)
अभ्यागत कक्ष : 7