पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत सेपक टकरॉमध्ये ऐतिहासिक कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले भारतीय पुरुष क्वाड्रंट संघाचे अभिनंदन
Posted On:
02 OCT 2026 6:09PM by PIB Mumbai
आशियाई क्रीडा स्पर्धेत सेपक टकरॉमध्ये ऐतिहासिक कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पुरुष क्वाड्रंट संघाचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी सांगितले की, या स्पर्धेतील पुरुष क्वाड्रंट प्रकारात भारताने प्रथमच पदक जिंकले आहे. संघाचा दृढनिश्चय आणि जिद्दीने लढण्याची वृत्ती अनुकरणीय असल्याचे त्यांनी सांगितले.
या यशामुळे देशभरात सेपक टकरॉ खेळाला आणखी चालना मिळेल, अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यम मंचावरील पोस्टमध्ये सांगितले:
“भारतीय सेपक टकरॉसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे!
आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल भारतीय पुरुष क्वाड्रंट संघाचे अभिनंदन. या स्पर्धेतील पुरुष क्वाड्रंट प्रकारात भारताने प्रथमच पदक जिंकले आहे. संघाचा दृढनिश्चय आणि जिद्दीने लढण्याची वृत्ती अनुकरणीय आहे. या यशामुळे देशभरात सेपक टकरॉ खेळाला आणखी चालना मिळो: पंतप्रधान नरेंद्र मोदी”
***
शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2318492)
अभ्यागत कक्ष : 5