राष्ट्रपती कार्यालय
गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा शुभेच्छा संदेश
Posted On:
01 OCT 2026 8:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2026
गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या: -
“राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157 व्या जयंतीनिमित्त, म्हणजेच गांधी जयंतीच्या या पावन प्रसंगी, मी सर्व देशवासीयांच्या वतीने त्यांना आदरपूर्वक आदरांजली अर्पण करते.
गांधीजींचे जीवन आणि त्यांचे विचार यांबद्दल जगभरात कमालीचा आदर आहे. आज जगभरातील अनेक भागांत युद्ध आणि संघर्षाचे सावट असून, त्याचे दुष्परिणाम सर्वच देशांना भोगावे लागत आहेत. अशा बिकट परिस्थितीत महात्मा गांधीजींचा शांतता आणि अहिंसेचा संदेश अधिकच दिशादर्शक ठरतो.
आपला देश 2047 पर्यंत ‘विकसित भारत’ हे राष्ट्रीय ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. या प्रवासात, विकासाचे लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावेत आणि एकही नागरिक त्यापासून वंचित राहू नये यासाठी सहानुभूती आणि समावेशकतेला प्राधान्य दिले जात आहे. हीच संकल्पना 'सर्वोदय' म्हणजेच सर्वांचे कल्याण आणि सर्वांचा अभ्युदय या महात्मा गांधींच्या मूलतत्त्वाला खऱ्या अर्थाने प्रतिबिंबित करते.
गांधी जयंतीच्या या शुभमुहूर्तावर, आपण सर्व जण आपल्या सदाचरणातून आणि सक्रिय सहभागातून एक समर्थ, विकसित आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी कटिबद्ध होण्याचा पुनरुच्चार करूया.”
* * *
शैलेश पाटील/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2317934)
अभ्यागत कक्ष : 14