पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या कंपाऊंड सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी कुशल दलाल, साहिल राजेश जाधव आणि गणेश मणिरत्नम थिरुमुरू यांचे अभिनंदन केले
Posted On:
30 SEP 2026 4:58PM by PIB Mumbai
आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या कंपाऊंड सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल कुशल दलाल, साहिल राजेश जाधव आणि गणेश मणिरत्नम थिरुमुरू यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
रोमहर्षक अंतिम सामन्यात या तिघांनी सुवर्णपदक जिंकले असे सांगून, त्यांची अचूकता आणि सांघिक खेळाच्या उत्कृष्ट कामगिरीची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
पंतप्रधान मोदी यांनी या विजेत्या तिरंदाजांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले आहे:
"कुशल दलाल, साहिल राजेश जाधव आणि गणेश मणिरत्नम थिरुमुरू यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात रोमहर्षक अंतिम फेरीनंतर सुवर्णपदक जिंकले. त्यांनी अचूकता आणि सांघिक खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. आपल्या विजेत्या तिरंदाजांचे अभिनंदन. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा: पीएम @narendramodi"
***
राधिका अघोर/राजश्री आगाशे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2317236)
अभ्यागत कक्ष : 11