अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीबीडीटीने प्राप्तिकर कायदा, 1961 अंतर्गत लेखापरीक्षणाच्या अधीन असलेल्या व्यक्तींच्या संदर्भात कर निर्धारण वर्ष 2026-27 साठी उत्पन्न विवरणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2026 वरून 21 नोव्हेंबर 2026 पर्यंत वाढवली

Posted On: 28 SEP 2026 7:03PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2026

 

प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 139 च्या उपकलम (1) मधील स्पष्टीकरण 2 खालील तक्त्यातील अनुक्रमांक 2 मध्ये नमूद केलेल्या व्यक्तींच्या बाबतीत, कर निर्धारण वर्ष 2026-27 साठी उत्पन्न विवरणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2026 आहे.

उत्पन्न विवरणपत्र सादर करण्याची वरील अंतिम मुदत, सीबीडीटी अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने 31 ऑक्टोबर 2026 वरून 21 नोव्हेंबर 2026 पर्यंत वाढविली आहे.

त्यानुसार, सदर कायद्याच्या कलम 139 च्या पोट-कलम (1) मधील स्पष्टीकरण 2 खालील तक्त्यातील अनुक्रमांक 2 मध्ये  नमूद केलेल्या व्यक्तींसाठी, कर-निर्धारण वर्ष 2026-27 करिता प्राप्तिकर कायदा, 1961 च्या तरतुदींनुसार लेखापरीक्षण अहवाल  सादर करण्यासाठीची निर्दिष्ट तारीख 30 सप्टेंबर 2026 वरून 21 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

यासंदर्भातील औपचारिक आदेश / अधिसूचना स्वतंत्रपणे जारी करण्यात येत आहे.

 

* * *

निलिमा चितळे/सोनाली काकडे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2316159) अभ्यागत कक्ष : 12