पंतप्रधान कार्यालय
आशियाई खेळांमध्ये पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये ऐतिहासिक रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून सावन बरवाल यांचे अभिनंदन
Posted On:
26 SEP 2026 11:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई खेळांमध्ये पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये ऐतिहासिक रौप्य पदक जिंकल्याबद्दल सावन बरवाल यांचे अभिनंदन केले आहे.
नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणारी आणि चार दशकांहून अधिक काळात या स्पर्धेत भारताला मिळालेले पहिले पदक असणारी ही कामगिरी अधिक विशेष आहे, कारण भारताबाहेर जिंकलेले हे देशाचे आशियाई खेळांतील पहिलेच मॅरेथॉन पदक आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. त्यांची सहनशीलता आणि दृढनिश्चय यांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे, असे नमूद करत मोदी यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
'एक्स' वर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान कार्यालयाने नमूद केले:
"आशियाई खेळांमध्ये पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये ऐतिहासिक रौप्य पदक जिंकल्याबद्दल सावन बरवाल यांचे अभिनंदन. नवीन राष्ट्रीय विक्रम आणि चार दशकांहून अधिक काळात या स्पर्धेत भारताचे पहिले पदक; भारताबाहेर जिंकलेले हे देशाचे आशियाई खेळांमधील पहिलेच मॅरेथॉन पदक असल्यामुळे हे यश अधिक विशेष आहे. त्यांची सहनशीलता आणि दृढनिश्चयाचा देशाला अभिमान आहे. पुढील प्रवासासाठी अनेक शुभेच्छा:PM @narendramodi"
* * *
यश राणे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2315512)
अभ्यागत कक्ष : 8