पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचा एकशिंगी गेंड्यांच्या संवर्धनाच्या प्रवासाला बळकटी देण्याच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकणारा एक लेख केला सामायिक
Posted On:
23 SEP 2026 3:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,23 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे.
पंतप्रधानांनी नमूद केले की भारताची गेंड्यांची कहाणी म्हणजे या प्रजातीचे उल्लेखनीय पुनरुज्जीवन आहे. ते पुढे म्हणाले की गेंड्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याने भारत आता एकशिंगी गेंड्यांच्या जगातील सर्वात महत्त्वाच्या संरक्षकांपैकी एक बनला आहे. या प्रजातीला आधार देणाऱ्या गवताळ प्रदेशांचे आणि पाणथळ जागांचे संरक्षण करणे हे त्याच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मोदी यांनी पुढे स्पष्ट केले की आवर्जून वाचावा असा केंद्रीय मंत्र्यांचा लेख असून सरकारी प्रयत्नांमुळे संवर्धनाचा प्रवास कसा अधिक मजबूत होत आहे हे अधोरेखित करणारा आहे.
पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले:
“भारताची गेंड्यांची कहाणी ही या प्रजातीच्या उल्लेखनीय पुनरुज्जीवनाची कहाणी आहे.
गेंड्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याने,भारत आता एकशिंगी गेंड्यांच्या जगातील सर्वात महत्त्वाच्या संरक्षकांपैकी एक बनला आहे. या प्रजातीला आधार देणाऱ्या गवताळ प्रदेशांचे आणि पाणथळ जागांचे संरक्षण करणे हे भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.”
केंद्रीय मंत्री @byadavbjp यांचा आवर्जून वाचावा असा हा लेख सरकारी प्रयत्नांमुळे संवर्धनाचा प्रवास कसा अधिक मजबूत होत आहे, यावर प्रकाश टाकतो.
निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2313895)
अभ्यागत कक्ष : 12