गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गृह मंत्रालयाकडून यूएपीए अंतर्गत 'शहजाद भट्टी नेटवर्क'ला दहशतवादी संघटना घोषित : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची माहिती

Posted On: 16 SEP 2026 10:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,16 सप्टेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहशतवादाविरुद्ध 'शून्य सहिष्णूतेचे' धोरण बाळगण्याच्या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने गृह मंत्रालयाने 'शहजाद भट्टी नेटवर्क'ला 'बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) कायदा' (यूएपीए) अंतर्गत दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले असल्याचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज सांगितले .

अमित शाह यांनी याबाबत 'एक्स' समाजमाध्यमावर वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या "दहशतवादाविरुद्ध 'शून्य सहिष्णुतेचे' धोरण अवलंबण्याच्या दृष्टिकोनानुसार, गृह मंत्रालयाने यूएपीए अंतर्गत 'शहजाद भट्टी नेटवर्क'ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे."

हा गट सीमापलीकडून शस्त्रे, स्फोटके आणि अमली पदार्थांची तस्करी करण्यासोबतच तरुण आणि भुरट्या गुन्हेगारांना दहशतवादाकडे वळवण्याच्या कारवायांमध्येही गुंतलेला आहे. भारताची लोकशाही संरचना आणि धार्मिक सलोख्याला लक्ष्य करत, या गटाने द्वेषपूर्ण डिजिटल मजकूरही प्रसारित केला.

सुवर्णा बेडेकर/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2311173) अभ्यागत कक्ष : 6