पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 17 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत सेमिकॉन इंडिया 2026 चे उद्घाटन करणार
सेमिकॉन इंडिया 2026 ची संकल्पना: सिलिकॉन ते सिस्टिम्स: परिसंस्थेची उभारणी
52 देशांमधील 600 हून अधिक कंपन्या आणि प्रतिनिधींचा सहभाग
सेमिकॉन इंडिया 2026 मध्ये जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, नेदरलँड्स, सिंगापूर आणि स्वीडन या देशांचे सहा कंट्री पॅव्हेलियन्स अर्थात विशेष दालने असतील
Posted On:
16 SEP 2026 8:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,16 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास नवी दिल्लीतील यशोभूमी येथे सेमिकॉन इंडिया 2026 चे उद्घाटन करतील. याप्रसंगी पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करतील.
17 ते 19 सप्टेंबर 2026 या कालावधीत होणारी ही तीन दिवसीय परिषद आणि प्रदर्शन सिलिकॉन ते सिस्टिम्स: परिसंस्थेची उभारणी' या संकल्पनेवर आधारित असेल. यामध्ये सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स मूल्य साखळीतील जागतिक व भारतीय कंपन्या, धोरणकर्ते, गुंतवणूकदार, संशोधक, स्टार्ट-अप्स, शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी एकत्र येतील. ही परिषद भारतातील सहकार्य, गुंतवणूक, नावीन्य आणि कौशल्य विकास यांना चालना देण्यावर लक्ष केंद्रित करेल. समांतर सत्रांमध्ये डिस्प्ले उद्योगातील प्रगती, सहकार्य आणि संयुक्त उपक्रमांना चालना देण्यासाठी सहा देशांच्या गोलमेज परिषदा, महिला नेतृत्वावरील मंच आणि इतर सत्रांचा समावेश असेल.
सेमिकॉन इंडिया 2026 मध्ये सर्वसमावेशक मूल्य-साखळी दृष्टिकोन स्वीकारला जाईल, ज्यामध्ये सेमीकंडक्टर सामग्री, उपकरणे आणि चिप डिझाइनपासून ते फॅब्रिकेशन, प्रगत पॅकेजिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि सिस्टिम्सपर्यंतचा प्रवास प्रदर्शित केला जाईल. नवीन सँड टू सिलिकॉन टू सिस्टिम्स मूल्य साखळी अनुभव सेमीकंडक्टर परिसंस्थेतील हा प्रवास सादर करेल.
सेमिकॉन इंडिया 2026 मध्ये 600 हून अधिक कंपन्या सहभागी होतील आणि सुमारे 50,000 अभ्यागत येण्याची अपेक्षा आहे; यात 52 देशांचे प्रतिनिधी, 400 हून अधिक वरिष्ठ अधिकारी आणि 150 हून अधिक वक्त्यांचा समावेश असेल. या प्रदर्शनात जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, नेदरलँड्स, सिंगापूर आणि स्वीडनचे प्रतिनिधित्व करणारे सहा कंट्री पॅव्हेलियन्स असतील, तसेच 12 राज्यांची दालने, स्टार्ट-अप पॅव्हेलियन, इनोव्हेशन शोकेस, विद्यार्थी हॅकाथॉन आणि वर्कफोर्स डेव्हलपमेंट पॅव्हेलियन यांचाही समावेश असेल.
शैलेश पाटील/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2311090)
अभ्यागत कक्ष : 9
Read this releasein:
Urdu
,
Malayalam
,
English
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada