पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्लीतल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची व्हिएतनामच्या समाजवादी प्रजासत्ताकाच्या पंतप्रधानांशी भेट

Posted On: 12 SEP 2026 12:54PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर व्हिएतनामच्या समाजवादी प्रजासत्ताकाचे पंतप्रधान महामहीम ले मिन्ह हुंग यांची भेट घेतली.

पंतप्रधान मोदींनी ब्रिक्स शिखर परिषदेत 'भागीदार देश' म्हणून व्हिएतनामच्या सहभागाचे स्वागत केले. व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस आणि व्हिएतनामच्या समाजवादी प्रजासत्ताकाचे अध्यक्ष महामहीम तो लाम यांच्या मे 2026 मधल्या भारताच्या अधिकृत दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांच्या संबंधांना 'वर्धित सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी'च्या स्तरावर नेण्यात आले होते. या बैठकीत दोन्ही नेत्यांना या द्विपक्षीय संबंधांमधल्या प्रगतीचा आढावा घेण्याची संधी मिळाली. दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवरही विचारांची देवाणघेवाण केली आणि आपली भागीदारी अधिक बळकट करण्याच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला.

भारत आणि व्हिएतनाम यांच्यात सामायिक सभ्यताविषयक वारसा, परस्पर विश्वास आणि सामंजस्यावर आधारित जुनी मैत्री आहे. व्हिएतनाम हा भारताच्या 'अॅक्ट ईस्ट धोरणा'चा  एक प्रमुख आधारस्तंभ आहे आणि भारताच्या आग्नेय आशियासोबतच्या व्यापक संबंधांमधला एक महत्त्वाचा घटक आहे.

***

शैलेश पाटील/निखिलेश चित्रे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2309452) अभ्यागत कक्ष : 4