पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांची घेतली भेट

Posted On: 11 SEP 2026 9:29PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांची भेट घेतली 

भारत  ब्रिक्स परिषदेचे अध्यक्षपद चौथ्यांदा भूषवत असल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. उभय नेत्यांनी बहुध्रुवीयतेचे महत्त्व आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसह  बहुस्तरीय संस्थांमध्ये समकालीन वास्तवाला प्रतिबिंबित करण्यासाठी  सुधारणांची आवश्यकता अधोरेखित केली.

याशिवाय दोन्ही नेत्यांनी सध्या जगात सुरु असलेले संघर्ष, नौवहनाचे स्वातंत्र्य, शाश्वत विकास, मानव केंद्रित कृत्रिम बुद्धिमत्ता, अक्षय ऊर्जा क्षेत्रातील प्रगती आणि जागतिक अन्नसुरक्षा यांसारख्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  संयुक्त राष्ट्र सरचिटणीस गुटेरेस यांना त्यांच्या उर्वरित कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

***
सुवर्णा बेडेकर/भक्‍ती सोनटक्के/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2309342) अभ्यागत कक्ष : 13