गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विकासाविषयीच्या सामायिक वचनबद्धतेने जोडलेल्या आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कशी असलेले संबंध भारतासाठी मोलाचे


शाश्वत विकास आणि मानवतेच्या व्यापक कल्याणासाठी ही भागीदारी पुढे नेण्याच्या सामायिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार

Posted On: 10 SEP 2026 9:54PM by PIB Mumbai

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत प्रिन्स रहीम आगा खान पाचवे' यांची भेट घेतली.

'एक्स' (X) प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले , “नवी दिल्लीत हिज हायनेस प्रिन्स रहीम आगा खान पाचवे यांना भेटून आनंद झाला. मानव विकासाविषयीच्या सामायिक वचनबद्धतेने जोडलेल्या आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कशी असलेले संबंध भारतासाठी अतिशय मोलाचे आहेत. आमच्या चर्चेत सामाजिक विकास, सिंचन, सहकार, भरड धान्यांचा समावेश असलेली नैसर्गिक शेती, आणि सौर ऊर्जा या क्षेत्रांमधले सहकार्य बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. शाश्वत विकास आणि मानवतेच्या व्यापक कल्याणासाठी ही भागीदारी पुढे नेण्याच्या आमच्या सामायिक वचनबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार केला.”

***

NehaKulkarni / NikhileshChitre / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2309046) अभ्यागत कक्ष : 7