पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जर्मनीच्या चॅन्सेलर समवेत दूरध्वनीद्वारे संवाद


दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये झालेल्या लक्षणीय प्रगतीबद्दल व्यक्त केले समाधान

परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही उभय नेत्यांनी केली चर्चा

Posted On: 10 SEP 2026 8:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जर्मनीचे चॅन्सेलर महामहिम फ्रेडरिक मर्झ यांनी आज दूरध्वनीवरून संवाद साधला.                 

यावर्षी भारत आणि जर्मनी राजनैतिक संबंधांची 75 वर्षे साजरी करत आहेत. पंतप्रधान आणि चॅन्सेलर मर्झ यांनी भारत-जर्मनी धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यांनी उच्चस्तरीय देवाणघेवाणीतील सातत्यपूर्ण गतीची दखल घेतली आणि व्यापार व गुंतवणूक, प्रगत तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा, संरक्षण, शिक्षण आणि प्रतिभेचे आदानप्रदान यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

उभय नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही आपले विचार मांडले. तसेच जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीला चालना देण्यासाठी एकत्रितपणे काम करणे सुरू ठेवण्याबाबत सहमती दर्शवली.


निलीमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2308903) अभ्यागत कक्ष : 6