ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अन्नधान्य व्यवस्थापनात कार्यक्षमता, तंत्रज्ञान आणि उत्तरदायित्व अधिक बळकट करण्यासाठी डीएफपीडी आणि एफसीआय यांच्यात 2026–27 या आर्थिक वर्षासाठी सामंजस्य करार

Posted On: 08 SEP 2026 8:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  8 सप्टेंबर 2026

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग (डीएफपीडी) आणि भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय ) यांनी नवी दिल्ली येथे 2026–27 या आर्थिक वर्षासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या कराराअंतर्गत एफसीआयसाठी कामगिरी संदर्भात एक सर्वसमावेशक चौकट निश्चित करण्यात आली आहे, ज्यात अन्नधान्य  व्यवस्थापनातील परिचालनात्मक कार्यक्षमता सुधारणे, उत्तरदायित्व बळकट करणे आणि आधुनिकीकरणाला गती देणे या उद्दिष्टांसह विशिष्ट लक्ष्ये निश्चित करण्यात आली आहेत.

या सामंजस्य करारामध्ये साठवणुकीतील नुकसान कमी करणे, साठवणूक क्षमतेचा अधिकतम वापर, लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी व्यवस्थापनात सुधारणा, आणि गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा मजबूत करणे यांसारख्या प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच, एफसीआयच्या कामकाजाची कार्यक्षमता, पारदर्शकता आणि देखरेख वाढवण्यासाठी व्यावसायिक प्रक्रियांचे व्यापक डिजिटायझेशन आणि आधुनिक माहिती तंत्रज्ञान प्रणालींचा अवलंब करण्यावरही भर दिला आहे.

आधुनिकीकरणाचा एक भाग म्हणून, या सामंजस्य करारामध्ये एफसीआयच्या कर्मचाऱ्यांसाठी क्षमता बांधणी आणि कौशल्य विकास उपक्रमांसाठी तरतूद आहे, ज्यामुळे संस्थेला उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि अन्नधान्य व्यवस्थापनाच्या समकालीन प्रणालीचा  प्रभावीपणे अवलंब करता येईल. 

हा सामंजस्य करार एफसीआयच्या कामगिरीला  स्पष्टपणे परिभाषित केलेल्या वार्षिक मापदंडांशी जोडून, एक मोजमाप करण्यायोग्य आणि परिणाम-केंद्रित दृष्टिकोन सादर करतो. या आराखड्याचा उद्देश संसाधनांच्या वापरात अधिक कार्यक्षमता वाढवणे, कामकाजात पारदर्शकता मजबूत करणे आणि संपूर्ण संस्थेमध्ये तंत्रज्ञान-आधारित उपायांचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे.

सामंजस्य करारातील उद्दिष्टांचा काही भाग डेपो दर्पण पोर्टलद्वारे एफसीआयच्या डेपोंच्या कामगिरीशी जोडला आहे. हे पोर्टल डेपोच्या पायाभूत सुविधा आणि परिचालन कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी एक वेब-आधारित व्यासपीठ आहे. भौतिक पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी, परिचालन कामगिरी सुधारण्यासाठी आणि एफसीआयच्या सर्व डेपोंमध्ये सातत्यपूर्ण सुधारणेला प्रोत्साहन देण्यासाठी परिणाम- आणि उद्दिष्ट-आधारित मापदंड समाविष्ट केले आहेत.

शैलेश पाटील/सुषमा काणे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2308044) अभ्यागत कक्ष : 9