संरक्षण मंत्रालय
संरक्षणमंत्र्यांची नवी दिल्लीत बेल्जियमच्या संरक्षणमंत्र्यांसोबत द्विपक्षीय चर्चा
संरक्षण सहकार्य संवाद, उच्चस्तरीय भेटी, प्रशिक्षण आणि क्षमता बांधणीच्या माध्यमातून संबंध विस्तारण्यावर दोन्ही बाजूंची सहमती
Posted On:
03 SEP 2026 10:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 सप्टेंबर 2026
भारताच्या दौऱ्यावर आलेले बेल्जियमचे संरक्षण आणि परराष्ट्र व्यापार मंत्री थियो फ्रँकेन यांच्यासोबत नवी दिल्लीत 3 सप्टेंबर 2026 रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी द्विपक्षीय बैठक घेतली. या संवादादरम्यान, दोन्ही बाजूंनी संरक्षण आणि औद्योगिक सहकार्याच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला. संरक्षण सहकार्य संवाद, उच्चस्तरीय भेटी, प्रशिक्षण आणि क्षमता बांधणीच्या माध्यमातून द्विपक्षीय संबंध वाढवण्यावर दोन्ही मंत्र्यांनी सहमती व्यक्त केली.
दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक शांतता आणि सुरक्षेच्या मुद्यांवरही चर्चा केली तसेच हिंद-प्रशांत प्रदेशात सागरी सुरक्षा सहकार्याची गरज विचारात घेतली. भारत आणि बेल्जियममधील भागीदारी ही परस्पर विश्वास आणि आदराच्या सामायिक मूल्यांवर आधारित आहे, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांच्यात नवी दिल्लीत झालेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली.
_20260903125035_f4e802.jpeg)
_20260903125044_8d0134.jpeg)
* * *
नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2306750)
अभ्यागत कक्ष : 19