वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत-अफगाणिस्तान व्यापारविषयक संयुक्त कार्यगटाची आभासी बैठक संपन्न


द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक सहकार्य बळकट करण्याच्या उपाययोजनांचा घेतला आढावा

संयुक्त कार्यगटाच्या चर्चेत व्यापार सुलभीकरण, सीमाशुल्क सहकार्य, कनेक्टिव्हिटी आणि गुंतवणूक या मुद्द्यांवर विशेष भर

व्यापारी संबंध अधिक दृढ करण्यासाठीच्या उपाययोजनांवर दोन्ही बाजूंची सहमती

Posted On: 02 SEP 2026 12:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 सप्‍टेंबर 2026

 

भारत-अफगाणिस्तान व्यापार, वाणिज्य आणि गुंतवणुकीवरील संयुक्त कार्य गटाची (जेडब्ल्यूजी) बैठक 1 सप्टेंबर 2026 रोजी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडली. या बैठकीला भारत आणि अफगाणिस्तानचे अधिकारी उपस्थित होते. यामध्ये वाणिज्य, उद्योग, सीमाशुल्क, नियामक प्राधिकरणे आणि राजनैतिक दूतावासांमधील प्रतिनिधींचा समावेश होता. यावेळी दोन्ही देशांनी द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक सहकार्याशी संबंधित विविध मुद्द्यांचा आढावा घेतला आणि दोन्ही देशांमधील व्यापार सुलभ करण्याच्या आणि व्यावसायिक गुंतवणूकीला बळकटी देण्याच्या उपाययोजनांवर चर्चा केली.

व्यापार सुविधा आणि सीमाशुल्क सहकार्य, अफगाण व्यापाऱ्यांसाठी व्हिसा सुविधा, बँकिंग आणि आर्थिक सहकार्य, औषधनिर्माण आणि कृषी व्यापार, ऊर्जा सहकार्य, गुंतवणूक आणि व्यापार प्रोत्साहन, शुल्क सवलती, कार्गो कनेक्टिव्हिटी आणि बंदरांशी संबंधित मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली.

दोन्ही बाजूंनी संस्थात्मक सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि निश्चित केलेल्या क्षेत्रांमध्ये पुढील कार्यवाही करण्यावर सहमती दर्शवली, यात वाढीव सीमाशुल्क आणि डेटा-शेअरिंग सहकार्य, औषधनिर्माण आणि कृषी क्षेत्रातील नियामक सहकार्य, सुधारित व्यापारी संपर्क आणि गुंतवणूक आणि व्यवसाय-ते-व्यवसाय संबंधांना प्रोत्साहन याचा समावेश आहे.

सौहार्दपूर्ण आणि रचनात्मक वातावरणात ही बैठक पार पडली. दोन्ही देशांनी भारत-अफगाणिस्तान व्यापार, वाणिज्य आणि गुंतवणूक संबंध अधिक दृढ करण्याच्या आपल्या  वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि चर्चेत समाविष्ट असलेल्या मुद्द्यांवर संवाद सुरु  ठेवण्यावर सहमती दर्शवली.

 

* * *

नेहा कुलकर्णी/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2305852) अभ्यागत कक्ष : 10