पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

चौथ्या भारत-जर्मनी पर्यावरण मंचाचे 1 सप्टेंबर 2026 रोजी नवी दिल्लीत आयोजन

Posted On: 31 AUG 2026 5:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 ऑगस्‍ट 2026

 

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव तसेच जर्मनीचे पर्यावरण, हवामान संरक्षण, निसर्ग संवर्धन आणि अणुसुरक्षा मंत्री कार्स्टन श्नाइडर यांच्या सहअध्यक्षतेखाली 1 सप्टेंबर 2026 रोजी नवी दिल्लीत चौथ्या भारत-जर्मन पर्यावरण मंचाचे आयोजन करण्यात आले आहे. 'अधिक लवचिकतेसाठी एकत्रित प्रयत्न' ही या मंचाची संकल्पना आहे. भारत आणि जर्मनी यांच्यातील पर्यावरण धोरणावरील हा सर्वोच्च स्तरावरील द्विपक्षीय मंच असून 2008 पासून त्याचे आयोजन केले जात आहे. भारत सरकारचे  पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय तसेच जर्मनीचे पर्यावरण, हवामान संरक्षण, निसर्ग संवर्धन आणि अणुसुरक्षा संघीय मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने, आणि आशिया-पॅसिफिक जर्मन व्यवसाय समिती  आणि भारतीय उद्योग संघटनांच्या सहकार्याने या मंचाचे आयोजन केले जात आहे.

यादव आणि श्नाइडर हे पर्यावरण संरक्षण आणि हवामान धोरणाशी संबंधित प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करतील. यात द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करणे, अनुभवांची देवाणघेवाण करणे आणि व्यावहारिक सहकार्याला चालना देणे या विषयावर भर दिला जाणार आहे. विषयाधारित सत्रांमध्ये कमी-कार्बन उद्योग; पाणथळ जागा, पर्वत आणि जंगलांमधील जैवविविधता; व्यवसाय प्रारुप म्हणून संसाधन कार्यक्षमता आणि चक्राकार अर्थव्यवस्था; तसेच शाश्वत वित्तपुरवठा, हरित कौशल्ये आणि गुंतवणूक उभारणी या क्षेत्रांमधील आव्हाने, उपाय आणि संधी यांवर चर्चा केली जाणार आहे.

हा मंच दोन्ही देशांमधील पर्यावरण आणि हवामान सहकार्यावर धोरणकर्ते, खाजगी क्षेत्राचे प्रतिनिधी, विचारवंत गट आणि इतर प्रमुख हितधारकांमध्ये द्विपक्षीय देवाणघेवाणीसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देईल. या मंचामध्ये मंत्रालये, उद्योग, तज्ञ गट आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

भारत आणि जर्मनी यांच्यातील मजबूत आणि वाढते आर्थिक तसेच औद्योगिक संबंध; शाश्वत तंत्रज्ञान आणि हरित अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात अधिक सखोल सहकार्याची शक्यता या संदर्भात या मंचाला महत्त्व प्राप्त होते.

 

* * *

सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2304957) अभ्यागत कक्ष : 9