युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या नेतृत्वाखाली मेजर ध्यान चंद राष्ट्रीय स्टेडियमवर राष्ट्रीय क्रीडा दिनाचे कार्यक्रम
‘एक घंटा खेल के मैदान मे’ उपक्रमातही डॉ. मनसुख मांडवीय सहभागी; खेळ आणि फिटनेस विषयक उपक्रमात अधिकाधिक सहभागी होण्याचे केले आवाहन
Posted On:
29 AUG 2026 1:57PM by PIB Mumbai
देशातील हॉकीचे जादूगर म्हणून ओळखले जाणारे विख्यात हॉकी खेळाडू, मेजर ध्यानचंद यांच्या 121 व्या जयंतीनिमित्त, देशभरात आज राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत आहे. भारतीय खेळाच्या इतिहासात, मेजर ध्यानचंद यांचे योगदान आजही अनेक क्रीडापटूंना प्रेरणा देणारे आहे.
नवी दिल्लीत इंडिया गेटजवळ असलेल्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम वर आज यानिमित, केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आणि केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या उपस्थितीत, एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यंदाच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण, ‘ एक घंटा खेल के मैदान मे’ हा उपक्रम होते. या उपक्रमाअंतर्गत, नागरिक, विशेषतः युवा खेळाडूंना, आपल्या दैनंदिन आयुष्यातला किमान एक तास तरी खेळ आणि शारीरिक उपक्रम, व्यायाम यासाठी देण्याकरिता प्रोत्साहन देण्यात येत आहे.

यावेळी मांडवीय यांनी, मेजर ध्यानचंद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सकाळी 8 वाजल्यापासून सुरु झालेल्या या कार्यक्रमात शेकडो लोक विविध क्रीडा आणि संबंधित कार्यक्रमात सहभागी झाले.
११११११११११
देशभर राबवल्या जात असलेल्या ‘एक घंटा खेल के मैदान में’ या उपक्रमाचा उद्देश ‘फिट इंडिया’ चळवळ अधिक बळकट करणे आणि नागरिकांना आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग म्हणून खेळांचा समावेश करण्यास प्रोत्साहित करणे हा आहे, असे मांडवीय यावेळी म्हणाले.
“राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजऱ्या होणाऱ्या मेजर ध्यानचंद यांच्या 121 व्या जयंतीनिमित्त ‘फिट इंडिया’ चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात ‘एक घंटा खेल के मैदान में’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.”, असेही ते पुढे म्हणाले.
_20260829140405_e3fa9c.jpg)
_20260829140420_676ead.jpg)
“देशभरातील लाखो तरुण प्रत्येक वस्तीत, प्रत्येक मैदानावर एक तास खेळण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश बदलत आहे, देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि एका नव्या भारताची निर्मिती होत आहे, हे सांगताना मला आनंद होत आहे,” असे डॉ. मांडविय म्हणाले.
“मोदीजींच्या नव्या भारताच्या निर्मितीच्या संकल्पनेची पूर्तता करताना प्रत्येक नागरिक तंदुरुस्त असावा आणि समाज निरोगी असावा, अशी आपलीही इच्छा असलीच पाहिजे. यातूनच आपल्याला समृद्ध राष्ट्र बनण्यास मदत होईल. आपण सर्वांनी दर आठवड्याला एक तास खेळाच्या मैदानावर घालवूया आणि आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊया.” असे आवाहन त्यांनी केले.
_20260829140844_25191d.jpg)
अर्जुन राम मेघवाल यांनी यावेळी सर्वांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शरीर आणि मन तंदुरुस्त राखण्यासाठी, नियमितपणे खेळ किंवा शरीरीक व्यायाम करण्याचे महत्त्व अर्जुन राम मेघवाल यांनी अधोरेखित केले.
_20260829140906_ca9175.jpg)
_20260829140922_acad89.jpg)
ते म्हणाले, “खेळ कायम माझ्या आयुष्याचा एक भाग राहिला आहे. कबड्डी पासून ते फुटबॉल, बॅडमिंटन असो, जवळपास दररोज मी खेळ खेळत असे. ‘सकाळी संगीत आणि संध्याकाळी खेळ’ हे माझे स्वतःचे ब्रीदवाक्य आहे. नियमित खेळ खेळल्याने आपण शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, निरोगी आणि मानसिक तणावापासून दूर राहतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिना’निमित्त ‘खेळांसाठी एक तास’ समर्पित करण्याचे आवाहन केले आहे. हे आवाहन भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हे आवाहन ‘हम फिट तो इंडिया फिट’ या उपक्रमाला बळ देते आणि विकसित राष्ट्र घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.”
_20260829140943_68a5bf.jpg)
सहभाग, सांघिक कार्य आणि सक्रिय जीवनशैली यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने क्रिकेट, फुटबॉल आणि रस्सीखेच (टग-ऑफ-वॉर) यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी क्रिकेट सामन्याचे देखील आयोजन करण्यात आले होते. या सामन्यात मिनिस्ट्री इलेव्हन , साई इलेव्हन, मीडिया इलेव्हन आणि इन्फ्लुएन्सर्स इलेव्हन हे चार संघ सहभागी झाले होते.
_20260829140952_92b18e.jpg)
मिनिस्ट्री ईलेव्हनच्या संघाचे नेतृत्व डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी केले. क्रीडा विभागाचे सचिव हरी रंजन राव आणि मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या मिनिस्ट्री इलेव्हन संघाने सलामीच्या सामन्यात मीडिया इलेव्हनवर दणदणीत विजय मिळवला. इन्फ्लुएन्सर्स इलेव्हनमध्ये प्रमुख सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि फिट इंडिया ॲम्बेसेडर्सचा समावेश होता.
मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून , मेजर ध्यानचंद यांच्या चिरंतन वारशाला अभिवादन करण्यासोबतच, देशभरात खेळ, शारीरिक तंदुरुस्ती आणि सक्रिय जीवनशैलीची संस्कृती रुजवण्याबाबतच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला.
_20260829141000_582fe9.jpg)
***
निलिमा चितळे/राधिका अघोर/सविता म्हसकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2304501)
अभ्यागत कक्ष : 11