नागरी उड्डाण मंत्रालय
'टेक्नाम P2006T' या दुहेरी इंजिन असलेल्या विमानाचा कानपूरमधील गंगा बॅरेजजवळ अपघात
Posted On:
27 AUG 2026 4:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑगस्ट 2026
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कानपूरच्या 'मेसर्स गर्ग एव्हिएशन लिमिटेड'द्वारे संचालित आणि 'VT-NBV' अशी नोंदणी असलेले 'टेक्नाम P2006T' हे दुहेरी इंजिनचे विमान 27 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी कानपूर नागरी विमानतळापासून सुमारे 5 एनएम अंतरावर, गंगा बॅरेजजवळ अपघातग्रस्त झाले.
हे विमान कानपूर नागरी विमानतळाच्या 'स्थानिक उड्डाण क्षेत्रात' प्रशिक्षण उड्डाणावर होते. विमानात एक प्रशिक्षणार्थी वैमानिक आणि एक प्रशिक्षक असे दोघे होते. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला.
आवश्यक नियामक देखरेख आणि समन्वयासाठी 'नागरी उड्डाण महासंचालनालया'च्या तीन अधिकाऱ्यांचे एक पथक घटनास्थळाकडे रवाना झाले आहे.
'विमान अपघात तपास विभागाला (AAIB) या घटनेची माहिती देण्यात आली असून, ते लागू असलेल्या नियमांनुसार या अपघाताचा सविस्तर तपास करतील. या तपासाद्वारे अपघाताची परिस्थिती आणि कारणे स्पष्ट होतील.
* * *
निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2303800)
अभ्यागत कक्ष : 9